Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

राष्टीय टेबल टेनिस : नाशिकच्या तनिषा, सायली, अनन्या व कुशलची निवड

Share

राज्य संघ प्रशिक्षकपदी जय मोडक

नाशिक | प्रतिनिधी 
राष्टीय टेबल टेनिस स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात नाशिकच्या तनिषा कोटेचा, सायली वाणी, कुशल चोपडा, व अनन्या फडके यांची निवड झाली आहे. टेबल टेनिसमध्ये चार खेळाडूंची निवड झाल्यामुळे नाशिककरांना चौघांकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा उद्यापासून (दि. १६) ते २२ नोव्हेंबर २०१९ पर्यंत खेळवण्यात येणार आहेत. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाळा येथे या स्पर्धा पार पडणार आहेत.
८१ व्या कॅडेट व सब. ज्युनिअर राष्टीय व आंतरराज्य टेबल टेनिस  स्पर्धेसाठी नाशिकच्या चार खेळाडूंची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली आहे. कॅडेट मुलींच्या संघात अनन्या फडके  तर सब जुनिअर मुलांमध्ये कुशल चोपडा यांची निवड झाली. सब ज्युनिअर मुलीच्या संघात तनिषा कोटेचा व सायली वाणी यांची  निवड झाली.
तसेच नाशिकचे टेबल टेनिस प्रशिक्षक जय मोडक याची राष्टीय स्पर्धेत सहभागी होणा-या  राज्य टेबल टेनिस संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. हे सर्व टेबल टेनिसपटू नाशिक जिमखाना येथे नियमित सराव करतात.
त्याच्या या निवडीबद्दल जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, संजय मोडक  राधेश्याम मुंदडा, नितीन चौधरी तसेच  संघटनेचे राजेश भरवीरकर, मिलिंद कचोळे, सतीश पटेल, संजय वसंत, अभिषेक छाजेड, राकेश पाटील, पुरुषोत्तम आहेर, हर्षल पवार व आदींनी  अभिनंदन केले असून त्यांना उत्तम खेळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!