Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : वाहनासह चार लाखांचा अवैध गुटखा जप्त

Share

नाशिक : मुंबई – अग्रा महामार्गावरील इंदिरानगर येथे उड्डाणपूलावर सापळा रचून राज्य शासनाने प्रतिबंध घातलेल्या गुटख्याची वाहतुक करणारी पिकअप मुंबईनाका पोलिसांनी ताब्यात घेतली. यामध्ये सुमारे 6 लाख रूपयांचा रंगबाज या पान मसाला गुटख्याचे पोते आढळून आले. तर वाहनचालकास एकास अटक करण्यात आली आहे. यातून मोठे गुटख्याचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जीपचालक जैद सलाउद्दीन शेख (33, रा.पाथर्डीफाटा) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, मुंबईनाका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील कर्मचारी सचिन करंजे, यांना शहरात अवैधरित्या गुटख्याचा मोठा साठा वाहून आणला जाणार असल्याची गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली होती. त्यांनी याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय ढमाळ यांना सांगितले.

त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी दिलीप सोनवणे, उपनिरिक्षक रेश्मा अवतारे यांच्यासह पथकाने द्वारका ते इंदिरानगर दरम्यान उड्डाणपूलावर सापळा रचला. रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याजवळ उड्डाणपूलावर एक पांढर्‍या रंगाची जीप (एम.एच15 डीके 4352) मुंबईच्या दिशेने आली. या खबर्‍याने दिलेल्या माहितीनुसर ही जीप असल्याने पोलीसांनी इशरा करून ती रोखून झडती घेतली. जीपमध्ये पांढर्‍या रंगाच्या पोत्यांमध्ये रंगबाज पान मसाला गुटख्याचा मोठा साठा मिळून आला.

सुमारे 6 लाख रूपये किंमतीचा हा साठा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी जीपचालक जैद सलाउद्दीन शेख यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच 4 लाख रूपयांचे वाहनदेखील जप्त केले आहे. एकूण 10 लाख रूपयांचा मुद्देमाल या गुन्ह्यात पोलिसांनी हस्तगत केला असून संशयित शेखविरूध्द अन्न सुरक्षा मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंबईनाका पोलीस करत आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!