Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे चार लाख 55 हजार तक्रारी; इ-वॉलेटच्या तक्रारींची संख्या वाढली

Share

नाशिक : प्रतिनिधी
राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनकडे गेल्या वर्षभरात चार लाख 55 हजार ग्राहकांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारी या फोनवरून दाखल करण्यात आल्या असून, सर्वात कमी तक्रारी इ-मेल, कन्झ्युमर अ‍ॅप व पोस्टल पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे डिजिटल पेमेंट करण्याच्या एक हजार 400 तक्रारींचाही समावेश असून ग्राहक राजा जागरूक असल्याचे दाखल झालेल्या तक्रारींच्या संख्येवरून दिसून आले आहे.

दाखल करण्यात आलेल्या या तक्रारी संबंधित कंपन्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी पाठविण्यात आल्या होत्या; तर इतर तक्रारी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत, अशी माहिती राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद करण्यात आली आहे. 1800 -11-4000 या किंवा 14404 टोल फ्री नंबरवर तक्रारदार फोन करून आपली तक्रार नोंदवू शकतात. 8130009809 या एसएमएसवर consumerhelpline.gov.in पोस्टाद्वारे, ई-मेलद्वारे तक्रारदार तकार करु शकतात.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनचे काम अधिक सुरळीत व्हावे म्हणून देशभरातील विविध राज्यांसाठी विभागीय हेल्पलाइनही सुरू करण्यात आल्या आहेत. अहमदाबाद, कोलकता, गुवाहाटी, बेंगळुरू, पटना व जयपूर अशा सहा विभागीय हेल्पलाइन कार्यरत आहेत; तसेच प्रत्येक राज्यासाठीही राज्य ग्राहक हेल्पलाइन कार्यरत आहेत. या हेल्पलाइनकडे तक्रार केल्यानंतर संबंधित तक्रारदाराला कोणाकडे संपर्क साधता येईल याची माहिती देण्यात येते.

त्याच्याकडून नोंदविण्यात आलेली तक्रार संबंधितांकडे पाठविण्यात येते. संबंधित जाब देणार कंपन्यांकडून या तक्रारींची दखल घेतली गेली नाही, तर ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार दाखल करावयाच्या न्यायिक कार्यक्षेत्रात कार्यरत ग्राहक न्यायालयाकडे तक्रार दाखल करण्याबाबत मार्गदर्शन केले जाते.

हेल्पलाइनकडे विविध माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या एकूण तक्रारी –
पोस्टल पत्रे – 121
फोन – 2, 75, 641
वेब – 1, 58, 624
एसएमएस – 13, 039
केंद्र सरकारचे पोर्टल – 4, 041
कन्झ्युमर अ‍ॅप – 2, 094
इमेल, वॉक -इन – 1, 344
एकूण – 4, 54 हजार 904

इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून बिल भरणे या संकल्पनेला ‘डिजिटल पेमेंट’ म्हणून ओळखले जाते आहे. वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी या सुविधेचा वापर केला जातो. डिजिटल पेमेंटच्या अडचणीबाबत 1 हजार 436 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यात यूपीआय मोबाइल बँकिंगबद्दलच्या 198, डेबीट/ प्रीपेड कार्ड – 154, ई-वॉलेट – 570, भीम यूपीआय – 113, आरटीजीएस/ एनईएफटी/ आयएमपीएस – 88, इतर – 29, इंटरनेट बँकिंग-229, क्रेडिट कार्ड – 27, आधार पेमेंट सिस्टीम – 18, भीम आधार/ आधार पे – 9

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!