Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

पंचवटीत पावणेचार लाखांच्या सिगारेटवर चोरट्यांचा डल्ला

Share

नाशिक : गोडावून समोर उभ्या केलेल्या ट्रकमधून चोरट्यांनी 3 लाख 79 हजार 467 रूपयांच्या सिगारेटच्या बॉक्सची चोरी केल्याचा प्रकार शनिवारी (दि.20) पंचवटीत घडला.

या प्रकरणी जितेंद्र किशनसिंग शेखावत (रा. डिंग्रजवाडी, कोरेगाव भिमा, जि. पुणे. मुळ रा भैसलाना, जयपूर, राज्यस्थान) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार शेखावत यांनी पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथून ट्रक (क्र. एमएच12, क्यु जी 3683) मध्ये महागड्या सिगारेटचे 27 बॉक्स वितरणासाठी भरून ते नाशिक येथे पाठवले होते.

ट्रक चालकाने ट्रक पंचवटीतील वैश्य इंटरप्रायजेस कंपनीच्या गोडावून समोर उभा केला होता. चालक जेवणासाठी निघुन गेल्याची संधी साधत चोरट्यांनी ट्रकमधील 3 लाख 69 हजार रूपयांचे सिगारेटचे बॉक्स लंपास केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरिक्षक एम.एस. शिंदे करत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!