Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘हे’ आहेत मनसेनेचे नाशिकमधील चार उमेदवार; ढिकलेंच्या भुमिकेकडे लक्ष

Share

जुने नाशिक | प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस मिळणार असल्याचे विविध पक्षांनी उमेदवारी जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या २७ उमेदवारांची पहिली यादी मुंबईहून जाहीर करण्यात आली आहे. मध्ये नाशिक जिल्ह्यातील चार जागांचा समवेश आहे.

माजी महापौर अशोक मुर्तडक यांना नाशिक पूर्व, माजी आ. नितिन भोसले यांना मध्य नाशिक तर दोन दिवसांपुर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र करणारे मनपा नगरसेवक दिलीत दातीर यांना नाशिक पश्‍चिम तर मनपा प्रभाग ११ चे विद्यमान नगरसेवक योगेश शेवरे यांना इगतपुरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मनसेना नेते शिरीष सावंत यांच्या सहीने जाहीर झालेल्या यादीत एकूण २७ उमेदवाराचे नाव आहे. विशेष म्हणजे मागील काही काळापासून पूर्व विधानसभा मतदार संघातून तयारी केलेले प्रदेश उपाध्यक्ष ऍड. राहुल ढिकले यांना डावलून मुर्तडक यांना उमेदवारी मिळाल्याने चर्चांना उत आहे आहे.

ढिकलेंच्या भुमिकेकडे आता सार्‍यांचे लक्ष लागले आहेत. शिवसेनेकडून इच्छुक असलेले नगरसेवक दिलीप दातीर यांनी पक्ष नेत्यांवर आरोप करुन राजिनामा देऊन मनसेनेत प्रवेश केला होता.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!