Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय विधानसभा निवडणूक २०१९

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या सविस्तर

Share

नाशिक : राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीकडे जात असून यामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रपती राजवट म्हणजे काय असते, यावरून जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे सोशल मीडियावर याबाबत विविध मिम्स आणि संदेश व्हायरल होत आहेत कि, राष्ट्रपती राजवट म्हणजे काय रे भाऊ?

दरम्यान राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. मागील सरकारची मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपली असली तर अद्याप राज्यात स्थिर सरकार स्थापन झाले नसल्याने राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे पत्रक काढले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीलाच्या सत्ता स्थापनेच्या मुदतीनंतर कोणत्याही क्षणी राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात.

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?
घटनेत अशी तरतूद आहे कि, एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा जर कोलमडली असेल तर त्या राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना ताशा स्वरूपाचा अहवाल पाठवावा लागतो. राष्ट्रपतींची खातरजमा झाली कि त्या राज्यात खरंच तशी परिस्थिती आहे तर ते त्या राज्याचा कारभार अंशतः किंवा काही कालावधीकरिता स्वतःच्या हातात घेऊ शकतात किंवा राज्यपालांमार्फत चालवू शकतात. राष्ट्रपती राजवट लागू केली तर ती दोन महिन्यांपर्यंत राहते. त्यानंतर कालावधी वाढवायचा असेल तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी लागते. अशा प्रकारे मंजुरी मिळाल्यानंतर ती पुढे सहा महिन्यांपर्यंत वाढवता येते, असं दोन वेळा करता येते. म्हणजे एक वर्षांपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. जर त्या नंतर निवडणुका झाल्या नाहीत तर निवडणूक आयोग राज्यात पोषक वातावरण नसल्याचा अहवाल देत तीन दिवस राष्ट्रपती राजवट लागू करता येते.

राष्ट्रपती राजवट केव्हा लागू होते?
तर भारतीय राज्यघटनेत कलम ३५२ ते ३६० हे आणीबाणीशी संबंधित आहे. राज्य राज्यघटनेत ३ प्रकारच्या आणीबाणीचे उल्लेख आहे. पहिली राष्ट्रीय आणीबाणी दुसरी आर्थिक आणीबाणी आणि तिसरी राष्ट्रपती राजवट. राज्यघटनेच्या कलम ३५६ मध्ये राष्ट्रपती राजवटीचा उल्लेख आहे. कलम ३५६ नुसार राज्याचे प्रशासन घटनात्मक पद्धतींना अनुसरून चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लावण्यात येऊ शकते. तसेच कलम ३६५ नुसार राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यास त्या राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करता येते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कुठलाही निर्णय राष्ट्रपती स्वतःच्या मर्जीने घेत नसून ते केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानंतरच घेतात.

राज्यात राष्ट्रपती राजवट लावता येऊ शकते का?
जे एखादया सरकारची मुदत संपल्यानंतर दिलेल्या अवधीत घटनात्मक शासन पद्धती स्थापन होत नसल्यास राष्टपती राजवट लागू करता येऊ शकते. उदा. फडणवीस सरकारची मुदत ९ नोव्हेंबरला संपुष्टात आली. त्यानंतर भाजप, शिवसेना याना सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. त्यामुळे यापुढे राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!