Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

पारावरच्या गप्पा : सत्तासंघर्षात गोरगरिबांचं काय?

Share
पारावरच्या गप्पा ! कोरोना : लॉक डाऊन म्हणजे काय रे भाऊ? Latest News Special Columan Paravarchya Gappa What is Lock Down

(गावातील समदी मंडळी पारावर बसलेली )

गण्या : काय र दाम्या, फराळ बी संपला, आर काल तुळशीचं लग्न झालं. पण ह्या युतीवाल्यांचं काही सोयरंसुतक जमणं ?
दाम्या : व्हय लेक, पुरता कंटाळून गेल्यात समदी यांच्या सत्ता स्थापनेपायी …

गण्या : आर तू काय त्यो पाऊस ह्यान्ला कंटाळून निघून गेला ..म्हणलं व्हता मुख्यमंत्री पाहून जातो म्हणून? कसलं काय
दाम्या : व्हय व्हय, अन आता ‘मंदिर वही बनायेंगे’च बी ठरलं ..पण यांचं काही ठरत नाही बुवा …
तुळश्या : दाम्या, पर यांच्या भांडणात आपुन काहून इंटरेस्ट घियाचा.. आपल्याला कोण इचारत?
(तेवढ्यात पाटलाच्या तुक्या मागून येतो )

समदी : राम, राम पाटील
पाटलाच्या तुक्या : राम, राम.. खरं हाय तुळश्या तुझं ..खरंच आपल्याला कोणच इचारत न्हाय … आपण फकस्त मतदान करायचं.. तुम्ही बघितलं का? मतदानाच्या आधी हे युतीवाल एकमेकाना कसं खांद्यावर घेऊन नाचत व्हतं.. आज तेच एकमेकांची उणीधुणी काढण्यात व्यस्त आहेत. पावसानं एवढं नुकसान केलं, पण कुणी आपुलकीनं शेतकऱ्याला इचारलं न्हाय.. आपल्या सामान्य लोकांचं हालच हाय …
रंग्या : तात्या पर, सरकार बी स्थापन झालं पाहिजे का न्हाय… आर टीव्हीवर नुसत्या त्याच बातम्या हायीत.. त्यो कोण माणूस हाय.. त्येनी पार बेजार केलय मोठ्या पार्टीला म्हण ..

तात्या : म्या बी ऐकून हाय ..आर सत्ता स्थापनेसाठी यांचं असच चालायचं.. यालाच तर राजकारण म्हणत्यात.
तान्या : पर तात्या यात गोर गरीब भरडला जातोया त्याच काय? आपल्या गावांनी औंदा एवढं १०० टक्के मतदान करून काय उपेग झाला?
तात्या : अर मतदान करणं हे आपलं कर्तव्य आहे, पर यांच्या भांडणात गोरगरीब भरडला जातोय हे मात्र नक्की..
तुळश्या : कामगार , विद्यार्थी, शेतकरी या राजकारणामुळे पुरता हतबल झाला आहे.. टीव्हीवाल्यामुळे समाजात अधिक राजकीय वातावरण तापवले जाते. सध्या परिस्थितीवरून लक्षात येते कि, लोकप्रतिनिधींना मतदारांपेक्षा सत्ता अधिक महत्वाची असते. त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.

रंग्या : तुळशीराम , अगदी बोललास .. पण आपण सामान्य जनता काय करणार?
तात्या : व्हय , सूचना झालंय… एकीकडे शेताची नुकसानीमुळे शेतकरी हतबल असून, दुसरीकडे शहरातल्या कंपन्या बंद पडल्यात, आंदोलने थांबायची नाव घेत नाहीत .. तरीबी आमदार खासदारांना जाग येईना.. त्यामुळे त्यांचा सत्ता संघर्ष आजच्याच नसून नित्याचा आहे. म्हणून गावकऱ्यांनी आपली कामे थांबवू नका..पोराबाळांना शिकवा तयानी चांगलं आफिसर बनवा म्हंजी ..तुमचं , समाजाचं जीवन सुकर व्हईल.. अर राजकारण चांगली गोष्ट हाय पर राजकारणी चांगला न्हाईत … (चला, जाऊया घराकडे)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!