Type to search

Breaking News आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

लोककलांना उतरती कळा अन् उपासकही उपेक्षित

Share

नाशिक | गोकुळ पवार : लोकांचे जगणे सुकर करणाऱ्या लोककलांना आज उतरली कळा लागली असून लोककलेचे उपासकही उपेक्षितपणे आपले जगणमांडताना दिसत आहेत. ह्या लोककला जनमानसात रुजवण्यासाठी तथा निरंतर राहण्यासाठी लोककलांना जिवंत ठेवले पाहिजे.

पहाटेच्या प्रहरी गाणं म्हणणारा वासुदेव, भक्तिमय वातावरणातील उत्साही सकाळ, त्यानंतर देवळात भजनात दंग होणारी सायंकाळ हे सर्व आठवलं कि माणसाच्या आयुष्यात या सर्व गोष्टीना एकेकाळी किती महत्व असल्याचे जाणवते. पंरतु आज धकाधकीच्या जीवनात आयुष्यात रंग भरणारे कलारूपी रंग फिकट होत चालले आहेत. लोकलला म्हटलं गावाकडची माणसं आपसूक आठवायला सुरवात होते. येथूनच खऱ्या अर्थाने लोककला उदयास आली. सुरवातीला पोवाडा, कीर्तनातील भारूड, जागरण-गोंधळ, वाघ्या-मुरळी, कलगी-तुरेवाले, पोतराज या कलांचे लोकांमध्ये गारूड होते. आता मनोरंजनाचे अनेक पर्याय उपलब्ध झाल्याने समृद्ध लोककलांना उतरती कळा लागली आहे.

लोककलांमधील कीर्तन -भारुडांनी लोकांमध्ये जनजागृतीची बीजे पेरली. तर त्यानंतर आलेला तमाशा हा सर्वाधिक लोकप्रिय प्रकारांमधील एक होता. यातील लावणी या लोककलेमुळे या दोन कलाप्रकारांचा असलेला स्वतंत्र चाहतावर्ग आज टिकून आहे. जागरण गोंधळ, भारूड, पोतराज, गवळण, पोवाडा, वाघ्या-मुरळी या लोककलांचा समृद्ध वारसा नाशिक जिल्ह्याला लाभला आहे. यातील कलेवर अतोनात प्रेम करणारे व आपलं सर्वस्व जीवन निर्भर असणारे शेकडो कलाकार सध्या ग्रामीण भागात वास्तव्यात आहेत. कला सादर करण्यासाठी लागणारी साधने, स्टेज, आधुनिक तंत्रज्ञान यान न जुमानता लोकांचे जगणं या कलाकारांनी मांडलं आहे.

आज आर्थिक स्थिती कमकुवत झाल्याने कलाकारांना हक्काचं व्यासपीठ मिळत नाही म्हणून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे शेवटच्या घटका मोजत असणाऱ्या लोककला जपण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. जेणेकरून या उपेक्षित लोककलांना ‘व्यासपीठ’ मिळून नव्याने उभारी घेण्याची ताकद मिळेल.

एकीकडे या लोककला लोप पावत असतांना या लोककला जनमानसात पोहचवण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या कलावंतांना जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. असं म्हटलं जात, माणसाकडे कला असेल तर कुठेही, कसंही जगता येत. पण कलेने जरी विश्व व्यापले असले तरी आजही ग्रामीण कलावंतांचे मात्र भाकरीचा चंद्र शोधण्यातच आयुष्य संपून जात आहे. तर दुसरीकडे आधुनिक जगात वावरणारा आधुनिक कलाकार या लोककलापासून कोसो दूर जाऊ लागला आहे. त्यामुळे नवीन पिढीने लोककलांची जोपासना करणे गरजेचे आहे. नाहीतर एकदिवस लोककला इतिहासजमा झाल्याशिवाय राहणार नाही.

लोककलावंतांना सुगीचे दिवस यायला हवेत. संपूर्ण आयुष्य लोककलेसाठी वाहील परंतु कधी धनाची अपेक्षा ठेवली नाही. परंतु निदान लोककला जिवंत ठेवण्यासाठी सर्वानी लोककला जपणे गरजेचे आहे.
-दादूबाबा महाले, लोककलावंत

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!