Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

उष्माघाताने मेलेले २९ मोर गेले कुठे?

Share

नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यात उन्हाळ्यात कमाल तापमानाने ४० चा आकडा पार केल्यानंतर चांदवड तालुक्यातील दहिवद व दिघवड या गावांमध्ये उष्माघातासह अन्य कारणांमुळे दोन आठवड़यात सुमारे ४० मोर दगावले होते. याबाबतचा वनविभागाचा अहवाल आला असून पैकी केवळ ३ मोरांचाच मृत्यू उष्माघाताने झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तर ०७ इतर कारणांनी मेले अशा ११ मोरांचाच मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांसह जिल्हाभरातून यावर संताप व्यक्त होत आहे.

यंदा उन्हाळ्यात राज्यासह जिल्ह्यात एप्रिलपासून उष्णतेची तीव्रता वाढली होती. ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान कमाल तापमानाचा पारा पोहचल्याने सर्वत्र होरपळल्यागत स्थिती झाली होती. उष्माघात माणसांसोबतच वन्यजीवांच्या जीवावर बेतल्याचे चित्र होते. चांदवड तालुक्यातील चांदवड-लासलगाव रस्त्यावर दहिवद व दिघवड या शेजारी-शेजारी असलेल्या दोन गावांमध्ये मोरांची संख्या सुमारे दीडशे ते दोनशेच्या घरात आहे.

येथील एक किलोमीटर चौरस परिसरात २७ एप्रिल ते ०९ मे या कालावधीत ४० पेक्षा अधिक मोर दगावले, असल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभाग तसेच जिल्हा प्रशासनास दिली होती.

उष्माघातामुळे अशक्तपणा आल्याने उडणे अशक्य झालेले काही मोर कुत्र्याच्या हल्लयात जखमी होवून मृत्युमुखी पडले, काही विहिरीत पडून दगावले होते. हलगर्जीपणा करत वनविभगाच्या अधिकार्‍यांनी मात्र केवळ ११ मोरांच्या मृत्यूंची नोंद केली होती. अहवालासाठी या ११ मोरांचेच नमुने घेण्यात आले होते. त्यांचा व्हिसेरा पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता.

या तपासणीचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार ११ पैकी ०४ मोर कुत्र्याच्या हल्लयात ठार झाले कुत्र्यांनी फस्त केल्याने त्यांचे नमुने मिळालेच नाहीत, ०४ मोर हे विहिरीत पडून मृत्युमुखी पडले आहेत. तर केवळ 3 मोर हे उष्माघाताने मेल्याचे त्यांचा व्हिसेराच्या पुणे येथील प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत आढळून आल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे. १० पेक्षा अधिक मोरांचा मृत्यू झाला असतानाही वनविभागाने मात्र केवळ ११ मोरांची नोंद केल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

जिल्हाभरातही मृत्यू
चांदवड तालुक्यातील भडाणे, रायपूर, लासलगाव, हिवरखेडे, मेसणखेडा, दहिवद, दिघवड, दुगाव या भागात एक हजाराहून जास्त मोर बघावयास मिळतात. कळवण तालुक्यातही मोर आढळतात. एप्रिल अखेरीस प्रचंड उष्म्यामुळे बैज, दह्याणे, खेडगाव येथे प्रत्येकी एका मोराचा मृत्यू झाला, तर अभोण्यात उष्माघाताचा एका मोराला त्रास झाला होता, मात्र वेळीच उपचार झाल्याने त्याला वाचविण्यात यश आले होते. येवला तालुक्यातील एरंडगाव येथे एप्रिल महिन्यात उष्माघाताने एका मोराचा बळी गेला.

76 कुंड़यांद्वारे पाण्याची सुविधा
मोरांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळांवर जाऊन पंचनामे केले आहेत. आता सबंधीत गावांतील 3 ग्रामस्थांना आम्ही नेमणुक केल्या आहेत. त्यानुसार काळजी घेतली जात आहे. दहिवद व दिघवड भागात 28 एप्रिलपासून आजतागायत 8 सिमेंटच्या कुंड़या, 13 मातीच्या, तर 55 प्लॅस्टिकच्या कुंड़यांद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. खाद्य म्हणून मक्याचा भरडा या मोरांसाठी दिला आहे.
– तुषार चव्हाण, उप वनसंरक्षक

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!