नाशिक जिल्ह्याच्या फुटबॉलपटुंचा गौरव सोहळा १५ ला

0

नाशिक । प्रतिनिधी
जिल्ह्यात फुटबॉल विकासासाठी कार्यरत असलेले प्रशिक्षक तसेच मागील वर्षभरात आयोजित विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश प्राप्त करणार्‍या खेळाडू आणि व्यक्तींंचा सत्कार समारंभाचे सोमवारी (दि.१५) आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.

कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृृह येथे सकाळी हा सत्कार सोहळा रंगणार आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील व राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सह संचालक नरेंद्र सोपल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या गुणगौरव समारंभात नाशिक जिल्ह्याच्या फुटबॉल खेळाच्या विकासासाठी अविरत कामगिरी केलेल्या व्यक्तीचा सन्मान करण्यात येणार असूून, सन २००१ ते २००५ या कालावधीत नाशिकमध्ये फुटबॉलच्या विकासासाठी काम केलेले निहाल अहमद खान आणि गेल्या २५ वर्षांपासून नाशिकरोड देवळाली परिसरात फुटबॉलच्या विकासासाठी असून, झटणारे अंबादास भालेराव यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे.

तसेच संघटनेच्या वतीने सन २०१८-१९ या वर्षात आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या व उपविजेत्या संघाना तसेच सदर वयोगटातील उत्कृष्ट खेळाडू आणि गोलकिपर यांना देखील सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नाशिक मधील सर्व क्रीडाप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष तसेच सर्व सदस्यांनी केलेले आहे.

प्लेअर ऑफ दि इयरसाठी मतदान
नाशिक शहर व जिल्ह्यातील खेळाडूमध्ये फुटबॉल या खेळाविषयी जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी संघटनेच्या वतीने १६ १८ व २१ वर्षा आतील मुलांमधून मोस्ट पॉप्युलर प्लेअर ऑफ द इयरची निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आलेले आहे. सदर मतदानामधून वरील वयोगटात कोणत्या खेळाडूस कौल मिळेल याकडे संगळ्या फुटबॉल खेळाडूचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

*