PhotoGallery : गर्दीत हरवली वाट, सजली दाट फुलांची नक्षी, हा सोहळा पाहण्या आला कुणी सैराट बावरा पक्षी

नाशिककरांंची अलोट गर्दी : पुष्प महोत्सवाची सांगता

0

नाशिक । प्रतिनिधी
गुलशनाबाद अशी ओळख असलेल्या नाशिकला गतवैभव प्राप्त करुन देणार्‍या ‘नासिकक्लब’ तर्फे आयोजीत पुष्प महोत्सवास रविवारच्या (दि.27) सुट्टीचा मुहूर्त साधत हजारो नाशिककरांनी भेट दिली. मन प्रफुल्लीत करणारे फुलांचे ताटवे पाहताना नाशिककर अक्षरश: हरवून गेले होते. सेल्फि तो बनती है अशी उर्त्स्फूत प्रतिक्रिया देत फुलांच्या दुनियेतील हे क्षण नाशिककरांनी मोबाईलमध्ये क्लिक केले. मागील तीन दिवसांपासून पुष्पप्रेमींना मेजवानी देणार्‍या या महोत्सवाची अलोट गर्दीने सांंगता झाली.

दरवर्षी गर्दीचे रेकॉर्डब्रेक करणारा पुष्पमहोत्सव नाशिककरांसाठी आकर्षणाचा विषय ठरला होता. पुष्पप्रेमी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांसह शहरातील नामवंतांनी या ठिकाणी भेट देत पुष्पमहोत्सवाचा आनंद लुटला. रविवारी सुट्टीमुळे नाशिककरांची पावले पुष्पमहोत्सवाकडे वळाल्याचे पहायला मिळाले. काहींनी परिवारासह फुलांच्या दुनियेत रमण्याचा आनंद लुटला. बच्चे कंपनीलाही फुलांची भुरळ पडली होती. दिल्ली, देराहदून, कोलकातात, आसाम आदी ठिकाणांहून आणलेल्या पुष्पांनी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. नानाविविध फुले व त्यांच्या प्रजातीची माहिती घेताना पुष्पप्रेमी दंग झाले होते. एवढ्या प्रकारचे फुले असू शकतात, असे भाव नाशिककरांच्या चेहर्‍यावर होते.

सुंदर व निसर्गरम्य ठिकाणी गेल्यावर सेल्फिचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. नाशिकक्लब पुष्महोत्सवात त्याची प्रचिती आली. येथील फुलांच्या ताटव्यांची मनमोहक मांडणी, फुलांचा मोर, हिरवळीचा सोफा,वाड्याचे कलात्मक दार, प्रेमाचे प्रतिक असलेल्या गुलाबाचा दरवळणारा सुंगंध या सर्वांचा मनसोक्त आनंद घेत पुष्पप्रेमी सेल्फि काढण्यात दंग झाले होते. लक्षवेधी पुष्परचना व उत्कृष्ट सजावटीने पुष्पप्रेमींना अक्षरश: मोहिनी घातली. रविवारी सायंकाळपर्यत पुष्पप्रेमींची गर्दी कायम होती. रेकॉर्डब्रेक गर्दीने या महोत्सवाची सांगता झाली. मागील तीन दिवसात चाळीस हजार नाशिककरांनी या पुष्प महोत्सवाचा आनंद लुटला.

मान्यवरांची मांदियाळी
पर्यटन मंत्रालयाच्या सचिव व पोलिस आयुक्त डॉ.रवींद्र सिंगल यांच्या पत्नी विनिता सिंगल यांनी पुष्पमहोत्सवाला भेट दिली. तसेच, विशेष पोलिस महानिरिक्षक छेरींग दोरजे व महाराष्ट्र पोलिस अकॅडमीच्या संचालक अश्वती दोरज यांनी भेट देत फुलांची माहिती घेतली. उद्योजक राहुल निगम, बांधकाम व्यावसायिक अभय भायबंग, डॉ.विजय काकटकर, अभियंता संजय पाटील, अरुण काबरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट दिली.

मुघल गॉर्डनची आठवण
राष्ट्रपतीभवनातील मुघल गॉर्डनला पुष्पप्रेमी आवर्जून भेट देत असतात. ‘नाशिकक्लब’ने आयोजीत केलेल्या पुष्पमहोत्साने नाशिककरांवर अशी काही भुरळ घातली की अनेकांंच्या मुघल गॉर्डनच्या आठवणी ताज्या झाल्या. मुघल गॉर्डनप्रमाणे फुलांचे नानाविविध प्रकार पहायला मिळल्याचे, या ठिकाणी भेट देणार्‍या पुष्प्रेमींनी सांगितले.े

LEAVE A REPLY

*