PhotoGallery : फुलझाडांच्या संगोपनातून विलक्षण ‘स्वानंद’

0

 नाशिक : ‘नासिक्लब’ आयोजित पुष्पोत्सव-2019 नासिक्लब येथे सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर पुष्पोत्सवाचे आयोजक रामेश्वर सारडा यांचे पुष्पोत्सवा बद्दलची भूमिका, उद्देश, भविष्यकालीन योजना, त्यांच्याच शब्दात.

‘नासिक्लब’ आयोजित पुष्पोत्सव-2019 हे सांघिक कामाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. फुलबाग फुलवणे, त्याची काळजी घेणे, त्यामध्ये बागकाम, वनस्पती, फुले याची माहिती असलेला बाग कर्मचारी निर्माण करणे, त्यांना प्रशिक्षण देणे हेच मोठे आव्हान होते. ते पेलत आम्ही ‘पुष्पविश्व’ निर्माण केले. हिवाळ्याचा हंगाम फुलांसाठी अतीउत्तम काळ असतो. यावेळी वातावरण देखील आल्हाददायक असते. त्यातच नाशिकला चांगल्या हवामानाची निसर्ग देणगी लाभलेली आहे. निसर्गातील प्रत्त्येक गोष्ट मानवाला ‘रिन्सॉन्स’ देतेच. त्याचप्रमाणे वनस्पती, झाडे यांच्याकडे आपण ज्या भावनेने पाहतो त्याच्या भावनेनूत ते आपल्याला प्रतिसाद देत असतात. मी क्लबमध्ये गच्चीत फुलझाडे लावली, ती वाढवली, त्याचे संगोपण केले. त्यासाठी आमच्या क्लबच्या सदस्य, चमूने उत्तम काळजी घेतली. मीही जातीने लक्ष घालतच होतो. त्याचे फलस्वरुप आज पाहायला मिळत आहे.

(फोटो : अभिषेक विभांडीक )

मनुष्याचे आयुष्य हे आनंददाचा विषय आहे. निसर्गातील, पानाफुलातून, आपण हा आनंद, चैतन्य, सुगंध वाटलाच पाहिजे असे माझे मत आहे. ‘नासिक्लब’च्या सदस्यांना फुलांच्या सौंदर्यातून आनंद वाटता यावा हा प्रदर्शन भरवण्याचा मुख्य उद्देश होता. क्लबच्या सदस्यांना केवळ ‘फॅसिलिटीज्’ देऊन थांबायचे नव्हते तर त्यांना आनंदही वाटायचा होता. फुले आनंददायी, चैतन्यशील विषय आहे. कुणीही फुलांचे सौंदर्य पाहिले, त्याचा सुवास घेतला तर निश्चितच आनंंदी होतोेच. त्यामुळे तीन वर्षांपूर्वी आम्ही पुष्पोत्सवास प्रारंभ केला. क्लबच्या सदस्यांसह नाशिककर पुष्पप्रेमींनाही या आनंदात सामिल करुन घेण्यासाठी पुष्पोत्सवाची संकल्पना मूर्त स्वरुपात उतरवली.

क्लबच्या गच्चीत, हिरवळीवर आम्ही देशभरातील विविध भागातून फुलझाडांची बीजे, रोपटे आणले. त्याची उत्तम निगा राखली. त्यातून हे सुरेख विश्व साकारले. आमच्या क्लबच्या सर्व सदस्यांच्या सहकार्याने जपलेल्या सपुष्प वनस्पतींची संपदा पाहूून अनेक प्रतिक्रिया येतात. परंतु मी म्हणेल, फूलांकडे पाहण्याचा त्यांचा स्वंतत्र दृष्टीकोन असेल परंतु फुलझाडांची बाग, त्यांचे संगोपण, आपल्या परिश्रमातून त्यांना आलेला पुष्पसंभार जेव्हा मी बघतो तेव्हा; मला विलक्षण आनंद मिळतो. हाच आनंद पुष्पोत्सवातून निसर्गप्रेमींना वाटत आहे. त्यात भरच पडते आणि माझाही आनंद वाढतो.

पुष्पोत्सवातून काही जणांनी जरी प्रेरणा घेऊन आपली बाग, गॅलरी, घरात फुलझाडे लावली आणि त्याला आलेल्या फुलातून आनंद मिळवला तरी माझा प्रदर्शनाचा उद्देश सफल होईल पुष्पप्रेमीही स्वत: फुलांचा आनंद अनुभवी शकतील. निर्सग विलक्षण आहे. त्याचे सौंदर्यही केवळ अप्रतिम आहे. फुलांतील आनंद मला मिळतो. त्या अर्थाने मी माझा आनंद शोधणारा पुष्पप्रेमी आहे. या सर्व पुष्पविश्वात माझ्या टीममधील सर्व सहकार्याचे योगदान मोठे आहे.

गेली तीन वर्ष ‘नासिक्लब’च्या पुष्पोत्सवाला नाशिककरांनी उंदड प्रतिसाद देत आनंद घेतला. त्यांना निसर्गाच्या या नाजुक, सुंदर आणि रंग, गंध, रुप या वैविध्य परिपूर्ण असलेल्या सपुष्प वनस्पती त्यांची मांडणी करुन मला ‘स्वानंद’ मिळतो. हाच आनंद इतरांना पुष्पोत्सवाच्या माध्यमातून वाटता येतोय याचेही मोठे समाधान आहे. तीन वर्षांपासून सुरू असलेला पुष्पमहोत्सवाचे हे सांगता वर्ष आहे. मात्र हा पुष्पप्रवास यानंतरही चैतन्यशील छंद, आवड, स्वानंद म्हणून सुरू राहणार आहेे. पूढील वर्षीपासून गुलाबांच्या देशभरातील प्रजीतींचा संग्रह असलेला ‘गुलाबा पुष्पोत्सव’ भरवण्याचा मानस आहे. त्यातून पुष्पप्रेमीनां चांगल्या संकल्पनावरील सुरेख पुष्पोत्सव पाहण्याचा आनंद मिळणार आहे.

LEAVE A REPLY

*