Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Gallery : गोदावरीची पाणीपातळी वाढली; रामसेतू पुलाला पाणी लागण्याची शक्यता

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर,इगतपुरी तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा आणि गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. गंगापूर धरणातून ८९७३ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे तर दारणा धरणातून १९ हजार ०२ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहेत.  नदीकाठी सावधानतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. विसर्ग वाढल्यामुळे गोदाघाट परिसरात गोदावरीचे रौद्ररूप सध्या बघायला मिळत आहे. दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागले असून रामसेतू पूलालादेखील पाणी लागण्याची शक्यता बळावली आहे.

विसर्ग वाढल्यामुळे गोदावरीतील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे नदीकाठी सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस सुरुच आहे. गोदावरी त्र्यंबकेश्वर उगमापासून ते थेट नाशिक शहरापर्यंत अनेक मंदिरे, वाहने पाण्याखाली गेली आहेत.

गोदावरी नदीच्या पुराचे परिमाण समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीला पाणी लागले आहेत तर रामसेतू पुलालाही पाणी लागल्यामुळे गोदावरी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

नाशिकमध्ये दमदार पाऊस झाल्याने गंगापूर, पालखेड धरण समूहांच्या पाणलोट क्षेत्रात पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. मुंबई हवामान विभागाने अतिवृष्टिचा इशारा दिला असून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

गंगाकाठावरील किरकोळ व्यावसायिकांच्या टपऱ्या हलवल्या आहेत. नदीकाठी सकाळचे व्यवहार, भाजीबाजार नियमित सुरु आहे.  पाण्याची पातळी वाढल्यामुळे सकाळी नाशिककरांनी गोदातीरावर पाणी पाहण्यासाठी गर्दी केलेली दिसून आली.

गोदावरीची क्षणचित्रे 

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!