Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

नाशिक, कोकणातील पूरग्रस्तांसाठी राज्य शासनाकडून २१०० कोटींचा प्रस्ताव

Share

नाशिक : राज्यातील पूरग्रस्त भागासाठी केंद्र शासनाकडे ६ हजार ८०० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारने केला आहे. यामध्ये कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी २१०५ कोटींची तरतूद केली जाणार आहे. त्यामुळे नाशिकमधील पूरग्रस्तांना या निधीद्वारे संसार उभारण्यास हातभार लागणार आहे.

दरम्यान कोल्हापूर- सांगली, नाशिक व महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सहा हजार कोटींचा प्रस्ताव काल (दि. १३.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे केला आहे. यामध्ये नाशिकचाही समावेश असल्याने नाशिकसह चांदोरी , सायखेडा येथील पूरग्रस्तांना आधार मिळणार आहे.

तसेच यंदाच्या महापुरात नाशिकसह चांदोरी-सायखेडा येथील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून या भागातील काही घरे जमीनदोस्त वा पाण्यात वाहून गेली आहेत, अनेकांची गुरे वाहून गेली आहेत तर पिकांचेही नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांना नव्याने जीवन उभे करण्यासाठी सरकारची ही मदत महत्वाची ठरणार आहे.

आज कोल्हापूर सांगलीसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देऊन पूरग्रस्तांना मदत करणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!