Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

राज्यातील पहिली नेट मिटरिंग ‘सोलर ट्री’ नाशिककरांसाठी खुली

Share

नाशिक : महाराष्ट्रातील पहिली नेट मिटरिंग असलेली “सोलर ट्री” नाशिकरांसाठी बघण्यास खुली केली आहे. नाशिक येथील नेविटास इफिसेन्स” कंपनी चे संचालक अमित कुलकर्णी ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेली सोलर तरी उद्या (दि. १४) रोजी प्रेक्षकांना बघण्यास खुली करण्यात येणार आहे.

दर वर्षी १४ डिसेंबर हा “राष्ट्रीय ऊर्जा सौरक्षण दिवस” म्हणून साजरा केला जातो. या दिना निमित्ताने सोलर ट्री चे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे. दिवसेंदिवस विजेची मागणी खूप जास्त प्रमाणात वाढत चालली आहे पण वीजनिर्मितीचे स्त्रोत मर्यादितच आहेत. पारंपरिक ऊर्जा स्त्रोत म्हणजेच खनिज तेल, कोळसा ई. ह्यांचा साठा केवळ पुढची २० वर्षे टिकेल इतकाच आहे. धरणांची संख्या ही मर्यादित असून जल-विद्युत निर्मिती प्रकल्प ही मर्यादितच आहेतं. घरोघरी एसी, फ्रीज ई. सारख्या उपकरणांचा वापर वाढल्यामुळे आपल्याला विजेचा तुटवडा जाणवतो.

बर्‍याच भागांना लोड शेडिंग ला ही सामोरे जावे लागते. कारखान्यांची ही विजेची मागणी वाढत चालली असून त्यांना अखंडित वीज पुरवठ्यासाठी जास्तं पैसे मोजावे लागतात. त्यात सगळ्यात मोठे संकट म्हणजे हवामान बदलामुळे होणार्‍या परिणामांचे! ह्याचा फटका शेती ला सगळ्यात जस्ता प्रमाणात बसतो. ही फक्त भारताची समस्या नसून जागतिक समस्या आहे. अश्या येणार्‍या संकटांना सामोरे जाण्यासाठी आपण आजच काही पावलं उचलणे गरजेचे आहे.

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवा या साठी सरकारने जनतेला केलेल्या आवाहनाचा चांगला परिणाम पाहायला मिळत असून उद्योगांनंतर आता घरगुती वीज ग्राहकही स्वतः विजेचे उत्पादन करून महावितरणाला वीज विक्री करू लागले आहेत. नाशिक मध्ये राज्यातील पहिल्या सोलर ट्री ची उभारणी झाली आहे. अवघ्या २ x २ फुट आकाराच्या जागेत ही ट्री उभी राहते. १ ते ३ किलोव्हॉट क्षमतेच्या या ट्री द्वारे १८ यूनिट पर्यंत दररोज वीज उत्पादित होते.

नाशिकमधील तरुण उद्योजक व संशोधक अमित कुलकर्णी ह्यांनी सौर ऊर्जेचा वापर वाढवा या साठी निरनिराळ्या संकल्पना आपल्या “नेविटास इफिसेन्स” या कंपनी च्या माध्यमातून अमलात आणल्या आहेत. ऊर्जा संवर्धंनासाठीच्या त्यांच्या प्रयोगाला अमेरिका येथील मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी (MIT, USA) तर्फे जागतिक परितोषिक मिळाले आहे तसेच सलग २ वर्ष तिथली शिष्यवृत्ती ही मिळाली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!