PhotoGallery : नाशिक : फायरिंग रेंज दणाणली; प्रेक्षकांनी अनुभवला युद्धभूमीचा थरार

स्कूल ऑफ आर्टिलरीतील वार्षिक अभ्यास सोहळा

0

नाशिक : दरवर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देवळाली फायरिंग रेंजमध्ये लाल प्रकाश आणि कर्णभेदी गर्जनांनी अभ्यास टोपची कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार (दि.१२) रोजी या कार्यक्रमाचे आयोजन देवळाली फायरिंग रेंजमध्ये करण्यात आले आहे. याप्रसंगी भारतीय जवानांसह अमेरिका, चीन येथील सैनिकांची देखील उपस्थिती आहे.

स्कूल ऑफ आर्टिलरी आपल्या विशेष पथकासह देशातील नागरिकांना प्रभावित करणाऱ्या प्रदर्शन करते त्यास अभ्यास तोपची नावाने ओळखले जाते. स्कूल ऑफ आर्टिलरी मार्फत केला जाणार हा वार्षिक अभ्यास असून जो भारतीय सैन्याच्या आदेशावर आयोजित केला जातो. यावेळी विविध शस्रांच्या माध्यमातून करण्या आलेल्या प्रात्यक्षिकांनी तोफेचा योग्य निशाणा, अचूक वेळ आणि साधलेला समतोल अप्रतिम होता. यामुळे स्कूल ऑफ आर्टिलरी सेंटर तसेच भारतीय सैन्याचे व्यवस्थापन वाखाणण्याजोगे होते.

 

 

 

 

 

 

यावेळी रॉकेट्स, मिसाईल, लक्ष्य प्राप्ती रडार, मनुष्य रहित विमानांचा यामध्ये समावेश होता. यावर्षी अत्याधुनिक अल्ट्रा लाईट होवित्झर एम-777, स्वयंचलित तोफ के-9 वज्र आणि भारतीय बनावटीचे रडार, तसेच भारतात तयार करण्यात आलेल्या आधुनिक हलका हेलीकॉप्टर, हलका लाडकू हेलिकॉप्टर, चेतक आणि चिता या भेदक तसेच सुसज्ज हेलिकॉप्टर जी भारताची ताकत दाखविते तिचेही दर्शन याप्रसंगी झाले.

या कार्यक्रमात आर्मी एव्हीएशन मध्ये असलेले अत्याधुनिक हल्का हेलिकॉप्टर, लढाऊ हल्का लढाऊ हेलिकॉप्टर चेतक आणि चिता भारतीय सेनेची ताकत दर्शीवतात. याप्रसंगी, लेफ्टनंट जनरल वाय के मोहन, इ व्ही एस एम डी एस एस सी, वेलींगटन, चे कामंडन्ट प्रमुख अतिथी आणि लेफ्टनंट, आर एस सलारीया आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*