आगीत तीन दुकाने व १२ दुचाकी जळून खाक

0
जुने नाशिक | दि. १४ प्रतिनिधी- सारडा सर्कल येथील मौलाना आझादरोड कॉर्नरच्या गॅरेज लाईनमध्ये आग लागून तीन गॅरेज जळून खाक झाले. आगीत एका गॅरेजमध्ये कामाला आलेल्या सुमारे १२ दुचाकींचा कोळसा झाला. एका गॅरेजसह एक कुशन रेडियम व एका सलूनची दुकान आगीत पुर्णपणे जळाली. वेळेवर मनपा अग्नीशामक दलाचे बंद दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला. आगीत जिवीत हानी झाली नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत लाखो रुपयांचा नुकवसान झाला.

ही घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. यामध्ये अजहर कमरोद्दीन शेख, जफर शेख यांचे कुशन रेडीयमचे दुकान, माजीद शेख अजीम यांचे मोटारसायकलचे गॅरेज तर चंद्रकांत वाघ यांची सलूनची दुकान जळाली. सारडा सर्कल भागातील टिळक भवन शेजारी गॅरेजची लाईन आहे.

याच भागात महावितरणची मोठी विद्युत लाईन असून त्याचा पोल आहे. मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या वार्‍यामुळे या तारींमध्ये शॉर्ट सर्किट होत होते. याबाबतची तक्रार महावितरणकडे देखील करण्यात आली होती, मात्र वेळीच दखल घेऊन काम न झाल्याने आज आग लागल्याचा आरोप नागरिकांनी केला. आज सकाळी दुकाने उघडण्याआधीच अचानक आग लागली.

यामध्ये हिरा गादीकुशन्स, रेडियम व पॉलीशची दुकान तर एक गॅरेजमध्ये ठेवलेल्या सुमारे १२ दुचाकींचा कोळसा झाला. तर वाघ यांच्या सलूनच्या दुकानाचे नुकसान झाले. वेळेवर ताहीर पान स्टॉल हलविण्यात आल्याने त्याचे नुकसान झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच शिंगाडा तलाव येथील अग्निशामक मुख्यालयातून पाण्याचे तीन बंब घटनास्थळी त्वरीत दाखल झाले. तर भद्रकाली पोलीसांचा ताफा देखील घटनास्थळी आला. अग्नीशामक दलाच्या जवानांनी जोरदार पाण्याचा मारा करून आग विझविण्यास सुरूवात केली.

मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविताना जवानांना सुमारे एक तासापेक्षा अधिक कालावधीपर्यंत शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर आग आटोक्यात आली. आगीत लाखो रुपयांचा नुकसान झाला, मात्र जिवीत हानी झाली नाही.

LEAVE A REPLY

*