Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

PhotoGallery : महात्मानगर येथील बिजनेस बँकेच्या इमारतीला भीषण आग

Share

नाशिक : महात्मानगर येथील बिजनेस बँकेच्या इमारतीतील चौथ्या मजल्यावर असणाऱ्या दालनाला आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान या दालनातील साहित्याने अचानक पेट घेतल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

दरम्यान आगीत कारडाचे  बांधकाम कार्यालय भस्मसात झाल्याची माहिती मिळाली आहे. कारडा कंट्रक्शनचे पाच कोटींचे फर्निचर जळून खाक झाले आहे तर महत्वाचे कागदपत्रेही जळाली आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश येत असून बिल्डिंगच्या वरील मजल्याला आगीने वेढले आहे. मनपाच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांसह एमआयडीसीचे अग्निशमन वाहनही दाखल झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची सर्व विभागातील फायर फायटर वाहने घटनास्थळी पोहचली आहेत. आगीचे स्वरूप गंभीर असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!