Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अखेर वाहन परवान्यासाठी शिक्षणाची अट रद्द

Share

नाशिक । अखेर नवीन वाहन कायद्यामध्ये वाहन परवान्यासाठी असलेली शिक्षणाची अट रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयात कमी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना परवाना तयार करून देणे सुरू करंंण्यात आले आहे. वाहन परवान्यासाठी यापूर्वी आठवी पासची अट होती.

त्यामुळे अनेकजण बोगस टीसी किंवा कागदपत्रे तयार करून वाहन परवाना काढत होते. देशात 22 ते 23 लाख वाहन चालकाच्या संधी आहेत. त्यामुळे त्यांना वाहन परवाना मिळाल्यास रोजगार मिळू शकतो. यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन चालविण्यासाठी शिक्षणाची अट रद्द करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार नवीन केंद्रीय मोटार वाहन कायद्यात वाहन परवाना घेण्यासाठी शिक्षणाची अट रद्द करण्यात आली आहे.

त्याची अंमलबजावणी राज्यभर करण्यात येत आहे. सध्या नाशिक आरटीओ कार्यालयात परवाना तयार करून देण्यात येत आहे. आतापर्यंत अनेकांना कमी शिक्षण घेतलेल्या तरुणांनी वाहन परवान्यासाठी अर्ज दाखल केला आहे. याबाबत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय आहिरे म्हणाले,‘ नाशिक आरटीओ कार्यालयात कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांना वाहन परवाना देण्याची कार्यवाही शासनाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आली आहे. सारथीच्या सिस्टिममध्ये आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास अशा उमेदवारांचा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत, असे त्यांनी सांगितले.

जन्मतारखेचा पुरावा आवश्यक
कमी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना लायसन्स काढण्यासाठी पूर्वी जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आठवी पासचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र दाखल करावे लागत होते. मात्र, नवीन कायद्यानुसार संबंधित उमेदवाराने जन्मतारखेचा पुरावा सादर करून अन्य आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून वाहन चालवण्याची परीक्षा दिल्यास अशा उमेदवारांना परवाना देण्यात येतो आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!