Type to search

Breaking News Featured क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : जागतिक आंतर्विद्यापीठीय तलवारबाजी स्पर्धेसाठी चौघे रवाना

Share

नाशिक | प्रतिनिधी

रोम इटली येथे सुरु झालेल्या जागतिक आंतर्विद्यापिठिय तलवारबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या तीन खेळाडू १ संघ मार्गदर्शक व्यवस्थापाक म्हणून सहभागी झाले आहेत.

दि. ३ ते १० जुलै २०१९ च्या दरम्यान रोम इटली येथे जागतिक आंतर्विद्यापिठिय स्पर्धा संपन्न होत आहेत. या स्पर्धेत इपी प्रकारात नाशिकची रोशनी मुर्तडक इची निवड झाली असून, फॉईल प्रकारात कोल्हापूरची ज्योती सुतार हिची निवड झाली आहे.

फॉईल मुलांच्या प्रकारात तुषार आहेर औरंगाबाद संघ समवेत मार्गदर्शक व्यवस्थापक म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी क्रीडा संचालक डॉ. उदय डोंगरे याची निवड झाली आहे.

भारतीय तलवारबाजी संघाचे प्रशिक्षण शिबीर अमृतसर (पंजाब) येथे संपन्न झाले. दि. ३० रोजी भारतीय संघ दिल्ली येथून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रवाना झाला आहे.

वरील सर्वाना महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष अशोक दुधारे, कार्याध्यक्ष प्रकाश काटूळे, क्रीडा उपसंचालक कांबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते आनंद खरे, राजू शिंदे , दिलीप घोडके, शेषनारायण लोढे, राजकुमार सोमवंशी, शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!