शेतकऱ्यांना मिळणार ५० % अनुदानावर हरबरा, गहू बियाणे

0

मटाणे (वार्ताहर) ता. ८ : शेतकऱ्यांना महाबीज अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेंतर्गत ५० टक्केअनुदानावर हरबरा, गहू पिकांचे राज्यस्तरावर ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबवून शेतकर्‍यांना अनुदान दिले जाणार आहे.

देवळा तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी महाबीजच्या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान अभियान योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानावर गहू बियाणे ५०% (प्रती क्विंटल रु.१६००) व हरबरा बियाणे ६० % (प्रती क्विंटली ४८००) प्रमाणे वितरकांमार्फत हरभरा व गहू बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना दिले जाणारे अनुदान जे कमी असेल ते अनुदानित दराने शेतकर्‍यांना परवाने दिले जाईल. तालुक्यातील जवळच्या महाबीज वितरकाकडे त्याचा पुरवठा केला करण्यात येईल.

प्रती शेतकर्‍यांस किमान एक एकर क्षेत्र मर्यादेपर्यंत देण्यात आले असून गावाची व लाभार्थ्यांची निवड कृषी विभागाच्या तालुका कृषीअधिकार्‍यांकडून करण्यात येवून निवड झालेल्या लाभार्थी शेतकर्‍यांना कृषी विभागातर्फे बियाणे खरेदी करण्याचे संमती (परमीट)  देण्यात येणार आहे. या योजनेचा देवला तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळ कृषी अधिकारी देवळा ए.एन. यांनी केले आहे.

निवड झालेल्या लाभार्थी शेतकर्‍यांनी ७/१२ चा उतारा आधारकार्ड व संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आदी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक यांच्याकडे केल्यानंतरच परवाने घ्यावे.

लाभार्थींमध्ये सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचीत जाती प्रवर्गातील ३५ टक्के व अनु.जमाती प्रवर्गातील ३० टक्के या प्रमाणे निवड करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*