Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिक : नोटकॅमद्वारे होतायेत शेतीचे पंचनामे; काय आहे ही प्रणाली?

Share

नाशिक | सुमित सोनवणे

राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शेतमालाची बिकट अवस्था बघून शासनाने तातडीने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.  मात्र, यंदा हे पंचनामे स्मार्ट पद्धतीने राबविण्यात येत आहेत. यामध्ये स्मार्टफोनमध्ये नोटकॅम नावाचे मोबाईल अॅप डाउनलोड करून नुकसानीचे फोटो काढले जात आहेत. यामध्ये जीपीएस तंत्रज्ञानामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे क्षेत्र हायलाईट केले जाते. त्यामुळे प्रशासकीय बाबी अतिशीघ्र पूर्ण होणार असल्याचा दावा केला जात आहे.

अतिवृष्टीमुळे नाशिक जिल्ह्यात मका, बाजरी, सोयाबीन, द्राक्षबाग यांसारख्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच कोरड्या दुष्काळात सर्वकाही गमवून बसलेल्या शेतकऱ्याला पुन्हा ओल्या दुष्काळानेही तोंडघशी पाडल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. अनेक भागातून उद्विग्न प्रतिक्रीया मिळत आहेत. यामुळे सरकारने याची योग्य दखल घेऊन पंचनाम्यांचे कामकाज अधिक वेगाने करून मदतीचा हात शेतकऱ्यांना देण्याची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाकडून थेट शेतकरी नुकसानीची तक्रार करू शकतील अशीही व्यवस्था करून दिली आहे,.


असे काम करते नोटकॅम

नोटकॅम हा एक कॅमेरा अँप आहे. जी.पी.एस. माहिती सह (अक्षांश रेखांश उंची आणि अचूक ते सह) वेळ आणि टिप्पनांसह हे एक संदेश सोडू शकतो. छायाचित्रात सर्व माहिती एकत्र ठेवू शकतो. आपण फोटो ब्राऊस करू तेव्हा आपणांस त्वरित त्याचे स्थान आणि पुढील माहिती कळू शकते.


प्रचंड वेळ वाचतो

नोटकॅम हे जी.पी.एस. ,माध्यम आहे याद्वारे सरकारला त्या शेतकर्याविषयी व कृषी क्षेत्रफळाविषयीची माहिती कळेल. खरोखर त्याच ठिकाणी शेती आहे की नाही हे या अँपद्वारे कृषी अधिकार्यांना समजेल व त्याच्या शेती विषयाची माहिती त्यांना ऑनलाईन बघता येईल.


शेतकऱ्यांच्या दृष्टीने फायद्याचे

यामागील पंचनामे ज्या वेळेस झाले त्या वेळेस फक्त कागदपत्र सातबारा,आधारकार्ड, पॅनकार्ड जोडली जात होती. एवढे कागदपत्रे देऊन शेतकर्यांना मदत मिळाली नव्हती? याचे कारण म्हणजे सरकारने जर शेतकर्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. तर लोक केवळ त्याचा गैर फायदा घेत असतात. त्यामुळे जे गरजू शेतकरी आहेत त्यांना याचा फायदा होत नाही. परिणामी शेतकरी कर्जबाजारी होतात. या तंत्राने सरकारला कामकाज करणे व योग्य आणि गरजू शेतकऱ्याला मदत करणे सहज शक्य होईल.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!