जिल्ह्यात शेतकरी बंदला प्रतिसाद; म्हाळसाकोरेत सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

0

(विविध तालुका प्रतिनिधींकडून)

नाशिक, ता. ५ :  शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदला नाशिक जिल्ह्यात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

सिन्नर तालुक्यातील वावी येथे आज सकाळी शेतकऱ्यांनी कांदा आणि दूध रस्त्यावर ओतून सरकारचा निषेध नोंदविला.

सिन्नर तालुक्यात शेतकरी आंदोलनाला प्रतिसाद मिळत असून ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

आज सिन्नरमध्ये दूधसंकलन बंद करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व्यावसायिकांनीही बंद पुकारला आहे.

निफाड शहरासह तालुक्यातही बंद सुरू आहे. शहरात शांततेत बंद सुरू आहे.

तर नांदुरमध्यमेश्वर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला असून वाहनांच्या रांगा रस्त्यावर लागल्या आहेत.

दिंडोरी तालुक्यातील पालखेड येथे भाजीपाला रस्त्यावर फेकण्यात आला.

म्हाळसाकोरे, ता. निफाड येथे बंददरम्यान युती सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

नांदगाव तालुक्यातील जातेगाव ही मोठी बाजार पेठ आहे. येथे दर मंगळवारी आठवडे बाजार भरतो.  शेतकरी संपास पाठींबा देण्यास बाजार मंगळवारी बंद ठेवण्यात आला आहे..

काल नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत शेतकरी संघटनांच्या कोअर कमिटीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.  या बंदमध्ये अत्यावश्यक आणि जीवनावश्यक सेवा सुरू राहणार आहे.

दरम्यान स्वाभीमानी शषतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी आज केवळ बंद पाळण्याचे आवाहन केले आहे. लग्नाची तिथी असल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*