Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सोशल मिडियावर फेक न्यूजचा ‘महापुर’; बनावट संदेश,व्हिडीओ व्हायरल

Share

नाशिक  : गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरु असून या वातावरणात सोशल मिडीयावर अनेक फेक फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

दरम्यान दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पूस कोसळत असून यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे.  तसेच शहरातील अनेक भागात पुराचे पाणी साचले आहे.परंतु या दरम्यान सोशल मिडीयावर अनेक फेक मासेजेस व्हायरल झालेअसून यामुळे चुकीची माहिती पसरत आहे. यामध्ये चार पाच वर्षापुर्वी खचलेल्या कसारा घाटाचे फोटो टाकले आहेत. तसेच मुंबईला जाणारी व नाशिकला येणारी वाहतुक पुर्णपणे बंद असल्याचे बनावट मसेज पसरविले जात होते. मात्र ती फक्त अफवा असुन सर्व फोटो जुने असल्याचे निदर्शनास आले आले आहे.

कसारा घाटात रस्त्याला तडे गेल्याची शहानिशा करण्यात आली .यामध्ये रस्त्याला तडे गेले आहेत परंतु खूप कमी प्रमाण आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील भावली धरणाला तडे गेले असुन धरणातील सर्व पाणी दारणा धरणात सोडण्यात येणार असल्याची अफवाही सोशल मिडीयावर रात्री पासुन फिरत होती. मात्र ही अफवा असल्याची माहीती भावली येथील ग्रामपंचायत सदस्य भाऊराव भागडे यांनी दिली.

गोदावरीला पूर आल्यापासून नेटकरी कोणत्याही व्हिडीओची शहानिशा न करता व्हायरल करत असल्याचे दिसून आले. या संदेशांमध्ये प्रामुख्याने भावली धरण फुटले, नाशिकच्या होळकर पुलावरून पाण, जळगावच्या हतनूर धरणाचा जुना व्हिडिओ गंगापूर धरण म्हणून व्हायरल झाला आहे; इतर जिल्ह्यातील पुराचे जुने पुराचे व्हिडिओ नाशिक जिल्ह्याप्रमाणेच व्हायरल झाले आहेत.

कसारा घाटाचे बनावट फोटो…

कसारा घाटाच्या नावाखाली एकूण सहा फोटो व्हायरल होत आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई-आग्रा हायवे घाट विभाग उद्ध्वस्त झाला आहे. रस्त्यावरून जोरदार दरड कोसळली असून पोलिस कर्मचारी घटनास्थळाचे सर्वेक्षण करीत असल्याचे या प्रतिमांमध्ये दिसत आहे. प्रतिमा क्रॉप केल्या आहेत आणि एडीट केल्या आहेत. जर कोणी त्यांना योग्य प्रकारे पाहिले तर तो त्या बनावट म्हणून सहज ओळखू शकतो. ज्या व्यक्तीने चित्रांचे संपादन केले आहे त्या व्यक्तीने सर्व चित्रावर अत्यंत हुशारीने वॉटरमार्क लावला आहे. त्यामुळे पाहणाऱ्या लोकांना हे फोटो खरे वाटत आहेत.

फेक न्यूज़ पसरविणाऱ्या सर्वांना सांगू इच्छितो की, अशा प्रकारचे कोणतेही फोटो सोशल मिडीयावर शेअर करू नका. आलेली माहिती पडताळून पहा, यामुळे आपल्याकडून कोणतीही चुकीची माहिती पसरणार नाही. अन्यथा आपत्ती  विभागाच्या अंतर्गत आपल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर योग्यरीतीने करा.

-जिल्हाधिकारी सुरज मांढरे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!