इस्पॅलियरच्या क्रीडा महोत्सवात विद्यार्थ्यांच्या चित्तथरारक कसरती

0

प्रतिनिधी । नाशिक : अडथळ्यांची शर्यत, रस्सीखेच, धावण्याची स्पर्धा, मानवी मनोऱ्यांच्या प्रात्यक्षिकांतून योगा, आर्मी टँक, हवाई दलाचे हेलिकॉप्टर आणि नेव्हीच्या पाणबुड्या यांचे चित्तथरारकरित्या सादरीकरण करत विद्यार्थ्यांनी क्रीडा कौशल्यांचे दर्शन घडवले. निमित्त होते, इस्पॅलियर स्कूलच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे.

इस्पॅलियर स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवासाठी कुमुदिनी बंगेरा, शाळेचे प्रमुख सचिन जोशी, प्राजक्ता जोशी, मुख्याध्यापिका अंकिता कुर्या आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा महोत्सवाची सुरुवात विद्यार्थ्यांनी केलेल्या सूत्रबद्ध संचलनाने झाली. विद्यार्थी प्रतिनिधी नचिकेत घुले व विद्यार्थिनी प्रतिनिधी कल्याणी कर्पे यांनी संचलनाचे नेतृत्व केले. पृथ्वी, जल, अग्नी, वायू हे संघ संचलन करत होते. क्रीडा ज्योतीचा मान राष्ट्रीय पातळीवरील खेळांडून देण्यात आला. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खेळांची आवड जोपासण्यासाठी तसेच त्यांच्यातील अंगभूत कौशल्यांना वाव मिळत असतो. विद्यार्थ्यांमधील अंगभूत गुण यानिमित्ताने सर्वांसमोर येत असतात. शालेय स्तरावरील खेळांतूनच भविष्याच राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडत असल्याने विद्यार्थ्यांना अशा स्पर्धांत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी सचिन जोशी यांनी केले.

माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव
क्रीडा महोत्सवातील विजेत्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थी अधिप गुप्ता, अलिअसगर अबुजीवाला, ताहा अबुजीवाला यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. क्रीडा महोत्सवाची सांगता जल्लोषात झाली.

LEAVE A REPLY

*