नाशिकने मला सांस्कृतिक समृद्ध केले – लॉरीयन फेरांदो

0

नाशिक (प्रतिनिधी) । आदिवासी वारली चित्रकलेतून मला भारतीय संस्कृती, कुटुंबव्यवस्था समजली. निसर्गाबद्दल , पर्यावरण रक्षणाविषयी आस्था यांचा प्रत्यय आला. मी माझ्या देशात परत जाईन तेव्हा वारली कलेचा सुंदर ठेवा माझ्याबरोबर असेल. नाशिकने मला सांस्कृतिक समृद्ध केले अशा भावना लॉरियन फेरांदो हिने व्यक्त केल्या.

रोटरी आदानप्रदान उपक्रमांतर्गत 36 विद्यार्थ्यांसह लॉरियन फेरांदो ही फ्रान्समधील रेम्स शहरातील विद्यार्थिनी नाशिकला आली आहे. वास्तुविशारद राखी टकले यांच्या घरी 6 महिने राहून तीने योगा, कथ्थक व गरबा हे नृत्यप्रकार तसेच रांगोळी, अरेबिक मेंदी या कला आत्मसात केली आहे.सध्या तीफ्रवशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये अकरावीत शिकत आहे.

राखी टकले यांनीच लॉरीयनला वारली चित्रकला शिकण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पत्रकार व वारली चित्रशैलीचे अभ्यासक संजय देवधर यांच्याकडून तीने प्रशिक्षण घेतले. मूलभूत आकार, रेषा, मानवी आकृत्या, पाड्यावरचे दैनंदिन जीवन, समृद्धीचे प्रतिक असणारा मोर, निसर्गसौंदर्य रेखाटण्यात ती रममाण झाली. गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढर्‍या रंगात होणारा तारपा नृत्याचा आविष्कार तिला अधिक भावला.

लॉरीयन पुढे म्हणाली, भारताविषयी मला खूप आकर्षण होते. नाशिक मला माझ्या रेम्स गावाची अनेक बाबतीत आठवण करुन देते एवढी साम्यस्थळे दोन्हीत आहेत.

सध्या प्रतिभा शिरोडे यांच्याकडे राहते. त्यांच्याबरोबर फिरताना व रविवार कारंजा भागात खरेदी करताना खूप मजा आली. विविध रंग, गन्ध यांनी हा परिसर नटला आहे.

सध्या नाशिकचे वातावरण, हवामान फ्रान्ससारखेच आहे याची गम्मत वाटते. माझ्या आई, वडील व भावाने मला नाशिकच्या दौर्‍यासाठी प्रोत्साहन दिले. दिवाळीनंतर आम्ही भारतातील अनेक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.मात्र सर्वात जास्त लक्षात राहील ते नाशिक.

येथीलगंगाघाट, मंदिरे आणि कौटुंबिक जिव्हाळा, सर्वांनी दिलेले अकृत्रिम प्रेम.आता मला आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील कला, निसर्ग, अनुभवायचा आहे.

LEAVE A REPLY

*