Type to search

नाशिक

एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा सुरू

Share

नाशिक । कला संचालनालयातर्फे घेण्यात येणार्‍या एलिमेंटरी, इंटरमिजिएट (रेखाकला) परीक्षेला बुधवारपासून (27 नोव्हेंबर) सुरुवात झाली असून, येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कला संचालनालयाकडून प्रश्नपत्रिका ऑनलाइन पाठविण्यात येणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील सुमारे एक हजार 160 परीक्षा केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिल्यांदाच ऑनलाइन प्रश्नपत्रिका पाठविण्यात येणार असल्यामुळे शिक्षक; तसेच केंद्रप्रमुखांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. ऑनलाइन प्रश्नपत्रिकांच्या निर्णयामुळे काही शाळा नाराज असून, काही केंद्रांनी नोंदणी देखील केली नसल्याचे उघडकीस आले आहे.

कला संचालनालयाकडून डेमो प्रश्नपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून चांगले सहकार्य मिळत आहे. कोणत्याही गोंधळाविना ही परीक्षा पार पडेल, अशी अपेक्षा असल्याचे महाराष्ट्र कलाध्यापक संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी व्यक्त केली आहे.

एलिमेंटरी ग्रेड वेळापत्रक
27 नोव्हेंबर : वस्तुचित्र : सकाळी 10.30 ते दुपारी 1.
स्मरणचित्र : दुपारी 2 ते 4
28 नोव्हेंबर : संकल्पचित्र नक्षीकाम : सकाळी 10.30 ते दुपारी 1 कर्तव्य भूमिती व अक्षरलेखन : दुपारी 2 ते 4
इंटरमिजिएट ग्रेड वेळापत्रक
29 नोव्हेंबर : स्थिरचित्र : सकाळी 10.30 ते दुपारी 1
स्मरणचित्र : दुपारी 2.30 ते 4.30
30 नोव्हेंबर : संकल्पचित्र नक्षीकाम : सकाळी 10.30 ते दुपारी 1.30
कर्तव्य भूमिती : अक्षरलेखन दुपारी 2.30 ते 5.30

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!