Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सप्टेंबरपासून नाशिक ते पुणे इलेक्ट्रीक बससेवा सुरू होणार

Share

नाशिक : येत्या सप्टेंबर पासून मुंबई-पुणे आणि नाशिक-पुणे या मार्गावर धावणार असून यासाठी दोनशे बसेससाठी निविदा काढण्यात आलेली आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक ते पुणे इलेक्ट्रीक बससेवा सुरू होणार आहे. दोन्ही शहरांदरम्यान इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एसटी महामंडळाकडून निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दरम्यान महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या माध्यमातून हि सुविधा राबविण्यात येणार असून यासाठी दोन्ही मार्गावरील घाट मार्गाचा विचार करण्यात येणार आहे. तसेच एकदा चार्ज केल्यानंतर सुमारे २५० किलोमीटर इलेक्ट्रिक बस धावू शकते. महामंडळाने नाशिक पुणे मार्गावर बस चालू करण्यासाठी परवानगी दिली आहे.

दरम्यान हा प्रकल्प खाजगी कंपनी लाँच करत असून बसची चाचणी घेतली जाणार आहे. त्यामुळे बस पुरवठादार कंपनी याबाबत लवकरच पाऊल उचलणार असून चाचणीनंतर लागलीच इलेक्ट्रीक बस नाशिक, मुंबई आणि पुणेनंतर इतर आंतरजिल्हा मार्गावरही धावू शकतील, असे मत महामंडळाने व्यक्त केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!