Type to search

नाव नोंदवणाऱ्यालाच करता येणार लोकसभेला मतदान

Breaking News नाशिक मुख्य बातम्या राजकीय

नाव नोंदवणाऱ्यालाच करता येणार लोकसभेला मतदान

Share

नाशिक । भारत निवडणूक आयोगाने 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान मतदार पुनरिक्षण मोहीम हाती घेतली असून या मोहीमेत मतदार यादीत नाव नोंदवणारया मतदारालाच आगामी लोकसभा निवडणूकित मतदान करता येणार आहे. या मोहीमेत अधिकाधिक मतदार नोंदणी करण्याकरीता नाशिक जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने जनजागृतीवर भर देण्यात येणार असून महाविद्यालयीन विद्यार्थी, दिव्यांग व्यक्तींच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक तहसिलदार गणेश राठोड यांनी सांगितले.

या मोहीमेविषयी बोलतांना राठोड म्हणाले, भारत निवडणूक आयोगाकडून शनिवारी विधानसभा मतदारसंघनिहाय तयार करण्यात आलेली मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, तेव्हापासूनच देशपातळीवर मतदार पुनरीक्षण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गतच 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान मतदार जनजागृती मोहीम म्हणजेच ‘स्वीप’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या जागृती मोहिमेत प्रामुख्याने नव मतदारांना आकर्षित करणे, शाळा, महाविद्यालयांमध्ये लोकशाहीचे महत्त्व पटविणे, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, तर पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नवीन मतदारांची नोंद, दुबार व मयतांची नावे वगळणे, नाव, पत्त्यात बदल, मतदार यादीत छायाचित्र समाविष्ट करण्यात येणार आहे. याकरीता आम्ही विविध माध्यमांतून जनजागृती करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. आजमितीस जिल्हयात 43 लाख 15 हजार 580 मतदार आहेत. तर 4228 मतदान केंद्र आहेत मात्र मध्यंतरीच्या काळात बीएलओंमार्फत घरोघरी जाउन राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी मोहीमेत मतदार संख्येत वाढ झाली असून ही यादी उद्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.

कॅम्पस अ‍ॅम्बेसेडर
1 जानेवारी 2019 रोजी वयाची 18 वर्ष पूर्ण करणारयांची नावे यामोहीमेत नोंदविण्याचे आयोगाने निर्देश दिले आहेत. याकरीता आता जिल्हयातील 67 महाविद्यालयांमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची माहीती संकलित करण्यात आली आहे. त्यानूसार जिल्हयात 42 हजार विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी ला प्रवेश घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांची या मोहीमेत नाव नोंदणी करण्यात येणार आहे. याकरीता कॅम्पस अ‍ॅम्बेसेडरची नियुक्ती करण्यात येउन त्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जाणार आहे.

आदिवासी भागात विशेष जनजागृती
विशेष करून आदिवासी भागात मतदानाचा टक्का कमी होतो याकरीता या मोहीमेत त्रयंबक, इगतपुरी, कळवण, सुरगाणा, दिंडोरी पेठ, बागलाण तालुक्यात आदिवासी बांधवांची नोंदणी करण्यासाठी विशेष जनजागृती करण्यात येणार आहे.

व्हीव्हीपॅटचा वापर
मागील निवडणूकित एका विशिष्ठ पक्षालाच सर्वाधिक मते मिळाल्याचा आरोप करत इव्हीएम यंत्राच्या वापराबाबतच अनेक संशय उपस्थित करण्यात आले. त्यामूळे आता विरोधकांनी मतपत्रिकांचा वापर करण्याचा आग्रह धरला आहे. परंतू आता हे आक्षेप खोडून काढण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत इव्हीएम यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र जोडण्यात येणार आहे. जेणे करून प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारास पडले याची खात्री करता येणार आहे. त्यामुळे शनिवारपासून सुरू होणाजया मतदान पुनरीक्षण मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराला त्याची माहिती व्हावी यासाठी आयोगाने प्रचारपत्रके छापून जनजागृती करण्यात येणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!