Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लोकसभा निवडणूक खर्चाची 10 कोटींची देयके अदा

Share

नाशिक । प्रतिनिधी
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक सुरळित पार पडल्यानंतर निवडणूक शाखेकडून या प्रकियेसाठी आलेल्या खर्चाच्या आकडयांची जुळवाजुळव करण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत निवडणूक शाखेने निवडणूक कामासाठी आलेल्या दहा कोटी रुपयांची देयके अदा केली आहेत. त्यामध्ये कर्मचार्‍यांचे मानधन, एसटीचे भाडे, वेब कास्टिंगचा खर्च आदीचा समावेश आहे.

लोकशाहीचा उत्सव समजल्या जाणार्‍या लोकसभेच्या निवडणूका देशभरात शांततेत पार पडल्या. निवडणुकीची तयारी कोणत्याही लग्नापेक्षा कमी नसते. निवडणूक प्रक्रिया सुरळित पार पाडावी यासाठी निवडणूक आयोगासह असंख्य हात दिवसरात्र राबत होते. जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी जवळपास 30 हजार मनुष्यबळ कार्यरत होते.

तसेच, ईव्हीएम, व्ही.व्ही.पॅट मशीनची वाहतूक, निवडणूक कर्मचार्‍यांची वाहतूक, ज्या ठिकाणी मतदान झाले तेथील मतदान केंद्रावर मुलभूत सुविधा पुरविणे, अंबड येथील वेअर हाऊसची डागडुजी, यंत्राच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची तैनाती, वाहतुकीसाठी भाडयाने घेतलेल्या वाहनांचा खर्च आदींसाठी निवडणूक शाखेला मोठया प्रमाणात खर्च करावा लागला.

या आकडयांची जुळवाजुळव निवडणूक शाखेकडून सुरु असून आतापर्यंत दहा कोटींचे देयके अदा करण्यात आली आहे. त्यामध्ये निवडणूक शाखेने 487 एसटी भाडयाने घेतल्या होत्या. त्या मोबदल्यापोटी एसटीला एक कोटी 29 लाख रुपये अदा करण्यात आले. अंबड वेअर हाऊसची रंगरंगोटी, मंडप,विदयुत व्यवस्था, निवडणूक कर्मचार्‍यासाठी जेवणाचा खर्च यासाठी 40 लाख रुपये खर्च झाले.

तर, निवडणूक कर्मचारी वाहतुकीसाठी छोटी – मोठी 500 वाहने भाडयाने घेण्यात आली होती. या वाहनांच्या भाडयापोटी एक कोटी रुपये अदा करण्यात आले. तसेच, डीजेल व पेट्रोलसाठी 90 लाख रुपये खर्च झाले. निवडणूक शाखेकडून इतर खर्चाची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरु असून हा आकडा आणखी फुगण्याची शक्यता आहे.

‘बीएसएनएल’चे 63 लाख बिल
तोटयात असलेल्या भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडला लोकसभा निवडणूक तारणहार ठरली आहे. निवडणूक आयोगाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील दहा मतदान केंद्राचे लाईव्ह वेब कास्टिंग केले होते. हे काम बीएसएनएलला देण्यात आली होती. नाशिक व दिडोरी मतदारसंघातील दहा मतदान केंद्राच्या वेब कास्टिंगची सेवा पुरविल्याबद्दल त्यांना 63 लाखांचे देयक अदा करण्यात आले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!