Type to search

सौंदाणे : मतदान केल्याची शाई दाखवा अऩ् पेट्रोल दरात सूट मिळवा

Breaking News नाशिक मार्केट बझ मुख्य बातम्या राजकीय

सौंदाणे : मतदान केल्याची शाई दाखवा अऩ् पेट्रोल दरात सूट मिळवा

Share

उमराणे वार्ताहर : जिल्हाभरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्याच धर्तीवर मतदान आपले कर्तव्य असल्याची जाणीव पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी जात असलेल्या नागरिकांना येत आहे.

सौंदाणे येथील देवरे पेट्रोलियमच्या वतीने २९ एप्रिलला सकाळी ०६ ते सायंकाळी ०७ वाजेपर्यंत लोकसभा मतदान करणाऱ्या ग्राहकासाठी निर्धारित दरापेक्षा ०१ रुपया कमी दराने पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती देवरे पेट्रोलियमचे रंजना देवरे, नरेंद्र शेवाळे, नयनेश विसपुते यांनी दिली आहे.

मतदारांनी मोठया प्रमाणात मतदान करावे लोकशाहीचा हा महामंहोत्सव साजरा करावा ह्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले पेट्रोल डिझेल भरपूर स्टोक करून ठेवण्यात येत आहे तरी जनतेनं लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!