Type to search

निवडणूक कामावेळी मृत्यू झालेल्या सोनवणे परिवारास मदत

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

निवडणूक कामावेळी मृत्यू झालेल्या सोनवणे परिवारास मदत

Share

 प्रतिनिधी । नाशिक
लोकसभा निवडणुकीच्या कामा वेळी मृत्यू पावलेले कृष्णा सोनवणे या निवडणूक कर्मचार्‍यांच्या पत्नीस भारत निवडणूक दिल्ली यांचे वतीने रुपये 15 लाख रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आला. शुक्रवारी (दि.31) तहसीलदार अनिल दौंड यांनी सोनवणे यांच्या पत्नीस मदतीचा धनादेश दिला.

सोनवणे यांची निवडणुकीसाठी इगतपुरीतील एका मतदान केंद्रावर नियुक्ती करण्यात आली होती. तेथून रात्रीच्या वेळी घरी परतत असताना 29 एप्रिलला सिबीएस येथेच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना त्यांच्या सहकार्‍यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले होते. सोनवणे हे देवळाली कॅम्प येथील एस.व्ही.के.टी. कला, विज्ञान आणि वाणिज्य या विना अनुदानित महाविद्यालयाचे कर्मचारी होते. या प्रकरणाचा तपास नाशिक तहसीलदार करत होते.

आयोगाच्या नियमानुसार निवडणूक कर्तव्य बजावताना अथवा ते पूर्ण करुन घरी परतताना कर्मर्‍याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांस मदत दिली जाते. निवडणूक आयोगाकडून त्यांच्या परिवाराला 15 लाख रुपयांचे सानूग्रह अनुदान देण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!