Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या विधानसभा निवडणूक २०१९

मतमोजणी केंद्रांवर जॅमर बसवण्यास निवडणूक आयोगाचा नकार

Share

मुंबई : मतमोजणी केंद्रांवर जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार होत आहे. मात्र, मतमोजणी केंद्रांवर जॅमर बसवण्यास निवडणूक आयोगाने नकार दिला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान विधानसभा निवडणूक प्रक्रिया पार पडली असून मतपेट्या स्ट्रॉंग रम मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवणार नाही, अशी स्पष्ट भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. यापूर्वी स्टाँगरूम आणि मतमोजणी केंद्रांवर मोबाईल जॅमर बसवण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. आता त्यावर हे जॅमर बसवणार नसल्याचे निवडणूक आयोगानं स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देतांना सांगितले कि, इव्हीएम मशीन्सना बाह्य यंत्रणांद्वारे हाताळता येऊ शकत नाही. त्यामुळे मतमोजणी केंद्र आणि स्ट्राँगरूममध्ये मोबाईल जॅमर बसवण्याच्या प्रश्नच उद्भवत नसल्याचे य्त्यानी सांगितले.

या संदर्भात आम्ही व्हिव्हिपॅट आणि इव्हीएमबाबत सर्व ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम राबवले आहेत. तसंच त्यांचा इंटरनेटशी, वायफायशी कोणत्याही प्रकारे संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत जॅमर लावण्याचा कोणताही प्रश्न उद्भवत नाही, असं सिंग यांनी स्पष्ट केलं.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!