Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

#EidMubarak : ईदनिमित्त विशेष दुआपठण, शहरात ईद उत्साहात

Share
नाशिक :  ईदची आज महाराष्ट्रासह देशभरात उत्साह आहे. शहर परिसरातही बलिदानाचा सण ईद-उल्-अज्हा अर्थात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह येथे सकाळी सामुदायिक नमाजपठण झाले. देशात शांतता नांदावी तसेच कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी विशेष दुआपठण करण्यात आले.
दरम्यान मुस्लीम बांधवांच्या बलिदानाच्या स्मृतिप्रीत्यर्थ बकरी ईद सण साजरा करण्यात येतो. या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथा आहे.
ईदगाह मैदानावर नमाज अदा करून समाजबांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच नमाज अदा केल्यानंतर समाजातील विविध स्तरांतील मान्यवरांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!