वधू-वरांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षणाची ‘अ‍ॅप’व्दारे प्रभावी जनजागृती

0

नांदुरी वार्ताहर : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत ‘एसएसजी१८’ या मोबाईल अ‍ॅपव्दारे स्वच्छ भारत मिशनविषयी नागरिकांच्या प्रतिक्रिया नोंदविण्यात येत आहेत. त्याची जनजागृती जिल्ह्यात प्रभावीपणे सुरू असून अभियानाच्या शेवटच्या दिवशी नांदुरी व सप्तशृंगी गड येथे पंचायत समिती कळवण कार्यालयातील ग्रामसेवक व संपर्क अधिकारी यांनी भाविकांच्या मोबाईलमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया नोंदवून घेतल्या . याठिकाणी नववधू दाम्पत्याने प्रतिक्रिया नोंदविली तर शेवटच्या दिवशी सप्तशृंगी गड व नांदुरी येथे १००० भाविकांकडून प्रतिक्रिया आल्या.

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत राज्यभरातील ग्रामीण भागात १ ते ३१ आॅगस्ट या कालावधीत केंद्रशासनाकडून स्वच्छ सर्वेक्षण २०१८ चे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये सर्वाधिक गुण मिळविणाºया जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरून २ आॅक्टोबर २०१८ रोजी पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नाशिक जिल्ह्यातीलही १३०० ग्रामपंचायतींमध्ये युद्धस्तरावर जनजागृती केली आहे.

याअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, मंदिर, यात्रास्थळ आदिंची स्वच्छताविषयक पाहणी केली आहे. यामध्ये शौचालय सुविधा, सांडपाणी व घनकचºयाचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याचे नियोजन आदी बाबींना प्राधान्य देण्यात यावे, असे शासनाचे निर्देश असून याबाबतच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘एसएसजी१८’ हे अ‍ॅप डाऊनलोड करून त्यावर अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते.

त्यानुषंगाने कळवण येथील स्वच्छ भारत मिशनच्या गटविकास अधिकारी डी.एम. बहिरम यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक सचिन मुठे , आस्क केंद्राचे तालुका व्यवस्थापक पिंटू मानवर , ग्रामसेवक आर.बी.चौरे ,रतीलाल जाधव , अशोक चव्हाण , अनिल चव्हाण , कांतीलाल पवार , रामू महाजन , सुनील आहेर , बी.डी.बहिरम टीम ने यासंदर्भात मार्गदर्शन केले. भाविकांनीही उत्स्फूर्तपणे अ‍ॅप डाऊनलोड करून आपापल्या प्रतिक्रिया नोंदविल्या.

LEAVE A REPLY

*