अ‍ॅड.हांडे महाविद्यालयात बी.एड.फॉर्म भरणे सुरू

0

नाशिक । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेशपरीक्षा कक्षामार्फत बी.एड. प्रवेशप्रक्रियेची नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली असून मराठा विद्या प्रसारक समाजाच्या नाशिक येथील बी.एड. महाविद्यालयात सामाईक प्रवेश प्रक्रियेच्या (सीईटी परीक्षा) मोफत मार्गदर्शनास सुरुवात झाली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात दोन वर्षाच्या बी.एड. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाची सीईटी बी.एड. प्रवेश सामाईक परीक्षा देणे अनिवार्य असते. सीईटी परीक्षेशिवाय बी.एड. अभ्यासक्रमास प्रवेश घेताच येत नाही. म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी खास मविप्रच्या अनुदानित शिक्षणशास्त्र महाविद्यालयात सीईटी परीक्षेच्या मोफत ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती माहाविद्याल्याचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत बोरसे यांनी दिली .

बी.एड. प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक
सीईटी परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याचा कालावधी दि.7 मार्च ते दि.25 एप्रिल2019. बी.एड. सीईटी परीक्षा 8 जून 2019 (मराठी माध्यम परीक्षा ) 9 जून 2019 (इंग्रजी माध्यम परीक्षा ),सीईटी निकाल दि. 20 जून2019

बी.एड.सीईटीसाठी कोण अर्ज करू शकतो?

पदवी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी, पदवी परीक्षेच्या शेवटच्या वर्षात शिकणारे(अ‍ॅपिअर) विद्यार्थी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, अ‍ॅपिअर विद्यार्थी.

बी.एड.सीईटी परीक्षा फी?
सर्वसाधारण संवर्गासाठी परीक्षा फी 800 रुपये., राखीव संवर्गासाठी 400 रुपये.

विद्यार्थी-पालकांसाठी आवाहन
बी.एड.अभ्यासक्रम लवकरच चार वर्षाचा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून याच वर्षी बी.एड.साठी प्रवेश घ्यावा. मविप्रचे बी.एड.महाविद्यालय हे जिल्ह्यातील एकमेव अनुदानित महाविद्यालय असून, महाविद्यालयाची फी जिल्ह्यात सर्वात कमी आहे. शिवाय सीईटी परीक्षेचे सर्व मोफत मार्गदर्शन व फॉर्म भरण्याची सुविधा मोफत आहे.

LEAVE A REPLY

*