Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

अखेर सानपांचा पत्ता कट; अँड. राहुल ढिकले भाजपचे उमेदवार

Share

नाशिक : नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवारी कुणाला मिळणार यावरून काल राजकीय धुळवड चांगलीच रंगली होती. अखेर आज भाजपने चौथी यादी जाहीर करीत या जागेचा तिढा सोडवला असून राहुल ढिकले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे.

दरम्यान नाशिक पूर्व मधून भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांच्या नावाची चर्चा होती. कालपर्यंत निर्णय लागला नसल्याने सानप समर्थकांनी संताप व्यक्त करत तडकाफडकी राजीनामे देण्यात आले होते. याबाबत सानप देखील मौन बाळगून होते.

पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असणार आहे, असेही सानप यावेळी म्हणाले. परंतु आज भाजपने चौथी यादी जाहीर केल्यानंतर सानप यांच्या उमेदवारीवर प्रश्चचिन्ह निर्माण झाले असून सानपांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!