Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

लवकरच नाशिकमध्ये तयार होणार ई-पासपोर्ट

Share

नाशिक : येत्या काही दिवसांत इलेक्ट्रिक चिप असलेले पासपोर्ट मिळणार असून नाशिक येथील इंडियन सेक्युरिटी प्रेस या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे.

या ई-पासपोर्टसाठी ४१३ डाकघर पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्यात येणार आहे. विदेश मंत्रालयाने सोमवारी सांगितले कि, देशात दरवर्षी ५०५ पासपोर्ट केंद्रातून एक करोडच्या आसपास पासपोर्ट देण्यात येतात. तसेच ई-पासपोर्ट याचवर्षी लागू होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. ज्यावेळी पासपोर्ट नुतकारां प्रक्रिया करण्यात येईल त्यावेळी नवीन ई-पासपोर्ट जरी करण्यात येणार आहे.

दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नागरी-केंद्रित सेवा पद्धतीने व्हाव्यात यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. याबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, मंत्रालयाने ई-पासपोर्ट प्रश्नाबाबत इंडिया सिक्योरिटी प्रेसशी चर्चा सुरू केली आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणाले की अमेरिका आणि चीननंतर भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात अधिक पासपोर्ट जारी करणारा देश बनला आहे. देशात सुमारे आठ कोटी नागरिकांना पासपोर्ट आहे. त्यांनी सांगितले की पासपोर्ट सेवा, विकास आणि प्रसार यामध्ये सुधारणा करण्याचे काम चालू आहे. देशाच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातून किमान एक पासपोर्ट सेवा केंद्र उघडण्याची योजना आहे.

काय आहे चिप ?
या ई-पासपोर्ट लावण्यात आलेल्या इलेक्ट्रिक चिपमध्ये वापरकर्त्याची संपूर्ण माहिती, बायोमीट्रिक डाटा आणि डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. इलेक्ट्रिक चिप लावल्यानंतर जुन्या पासपोर्टच्या ठिकाणी ई-पासपोर्ट आपली जागा घेणार. जर ई-पासपोर्टमध्ये कोणतीही चुकीची घटना होताना आढळून आली तर लागलीच पासपोर्ट सेवा प्रणालीला ही माहिती तात्काळ जाईल. यामुळे पासपोर्ट प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण होणार नाही. या चिपमुळे आपल्याजवळ पासपोर्ट नसेल तर आपली कोणतीही माहिती वाचली जाऊ शकणार नाही.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!