Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

स्टाफ सिलेक्शनच्या परिक्षेत डमी पकडला

Share

नाशिक  : पुणे रोडवरील नेहरूनगर येथे केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शनने कमिशनने आयोजित केलेल्या कॉन्स्टेबल जीडीच्या परिक्षेत डमी बसलेल्या एकाला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अनिकेत कैलास जाधव (वय-२१, रा. अनवा, ता. भोकरदन, जि. जालना) व त्याचा अनोळखी साथीदार या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहरुनगर येथील सीआयएसएफच्या ग्राऊंडवर स्टाफ सिलेक्शन बोर्डाकडून कॉन्स्टेबल जीडी या पदासाठी ऑनलाईन परिक्षा आयोजित करण्यात आली होती.

या परिक्षेत संशयित अनिकेत जाधव याने (दि.०७) रोजी स्वत:च्या भरतीसाठी अनोळखी साथीदाराच्या मदतीने रोल नंबर ७२०२७३५६५९ वर दुसर्‍या उमेदवारास ऑनलाईन लेखी परिक्षेसाठी डमी बसविले. हा प्रकार येथील सीआयएसएफचे सहायक कमांडंट परमजीत सिंग यांना लक्षात आला. त्यांनी याबाबत उपनगर पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.

या प्रकरणी दोघांवर शासनाच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जाधव करीत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!