Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दुष्काळ निवारणासाठी आमदार निधीची मदत

Share

नाशिक । लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर शासनाने पूर्ण क्षमतेने दुष्काळ निवारणावर लक्ष केंद्रीत केले आहे. तातडीची मदत म्हणून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे.आता आमदारांनाही त्यांच्या विकास निधीतून 25 लाखांपर्यत दुष्काळ पीडितांसाठी मदत करता येणार आहे. शासनाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. या निर्णयामुळे दुष्काळाशी दोन हात करण्यास मदत होईल.

राज्यात 1972 पेक्षाही दुष्काळाची भयाण परिस्थिती आहे. दुष्काळात तत्काळ पाणी पुरवठा व्हावा व इतर मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत टंचाई निवारणार्थ उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानूसार आमदार दुष्काळ निवारणासाठी 25 लाखांपर्यतची कामे व सुविधा उपलब्ध करुन देऊ शकतात.

टंचाई निवारणाच्या योजनेंतर्गत आमदारांना तात्पुर्ती पाणी साठवण व्यवस्था कऱणेसाठी टाकी बांधणे, प्लास्टीक साठवण टाकी बसवणे, चारा छावणीतील जनावरांना खाद्य देण्यासाठी बकेट टब्ज देणे, गोशाळा शेड उभारणे तसेच पाण्याच्या उपलब्धतेसाठी आवश्यक साहित्य पुरवठा करणे आदी कामे केली जाऊ शकतात. जिल्हाधिकार्‍यांनी याबाबत प्रांताधिकार्‍यांनाही सूचना दिल्या आहेत. बहुतांशी उपाययोजना टंचाई निधीतून यापुर्वीच सुरु झालेल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हयात टंचाईग्रस्त भागात पाणी पुरवठ्याची नियोजन आणि व्यवस्था करण्यात आली आहेत.

आमदार टंचाई निवारणार्थ योजनेची अंमलबजावणी तत्काळ सुरु झाली आहे. आमदार त्यांच्या निधीपैकी 25 लाखांपर्यंत मदत करु शकतात. त्याचे आदेशही सर्वच प्रांताधिकार्‍यांना देण्यात आले आहे.
– सूजर मांढरे, जिल्हाधिकारी

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!