Type to search

Breaking News Featured maharashtra नाशिक मुख्य बातम्या

केरळात मान्सून दाखल; लवकरच राज्यात धडकणार

Share

नाशिक : राज्यातील नागरिकांची उन्हाने काहिली झाली असुन यापासून लवकरच सुटका होणार आहे. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात बळीराजासह नागरिकांना मान्सूनची प्रतिक्षा होती. परंतु आता ही प्रतिक्षा संपली असून मान्सून केरळात दाखल झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मान्सूनच्या आगमनामुळेभारतीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेल्या तापमानामुळे तसेच भयाण दुष्काळामुळे नागरिक हतबल झाले होते. त्यातच दुष्काळामुळे पावसाच्या आगमनाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या दोन तीन दिवसात मान्सून महाराष्ट्रातही दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे बळीराजासह सामान्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील २४ तासांत मान्सून ईशान्य भारतातही सक्रीय होणारअसल्याची माहिती हवामान विभागाने वर्तविली आहे. मागील वर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात पासून अंदमान-निकोबार येथे धडकला होता. त्यानंतर लवकरच तो केरळात दाखल होईल, अशी आशा होती. मात्र वाऱ्याचा वेग मंदावल्याने मान्सून केरळात ६ जून रोजी दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. परंतु तसे न होता मान्सून आणखी लांबणीवर राज्यातील काही भागात पूर्वमोसमी पावसाने आगमन केले असून लवकरच तो राज्यातही दाखल हिऱ्यांची चिन्हे आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!