Type to search

नाशिक ब्लॉग

Blog : रंगभूमीच्या कलाकारांबाबत एवढी उदासीनता का ?

Share

नाशिक : नाटक म्हटलं कि सर्वात आधी आपल्यासमोर नटाचा चेहरा येतो. त्यामुळे आजही मराठी नाटके तितक्याच तन्मयतेने पहिली जातात. मराठी कलाकार आवाजही आपणास संघर्ष करतांना दिसून येतो. रंगभूमीवरील प्रत्येक भूमिकेसाठी जीव तोडून मेहनत घेत असतो. दिवस रात्र नाटक शुटींग सर्व काही धावपळीचं जीवन मग कधीतर उपाशी राहण्यापर्यंत हा मराठी कलाकार आपल आयुष्य ऱंगभुमीच्या सेवेत अर्पण करत असतो.

नाटकात भुमिका नाही मिळाली तर छोट्यामोठ्या भुमिकेसाठी धडपड चालूच असते. नाटक सुरु झाल तरी किती दिवस काम मिळणार याचीही माहीती नसते. एका नाटकामागे बरीच मंडळी राबत असते. नाटक उभ करणही तेवढ फारस सोप काम नाही अऩ नाटक उभ राहीलच तरी ते चालेलच याची खात्री नसते. शासन अऩुदान जरी मिळत असल तरी ते अनुदानसाठी एकेक दोन दोन वर्ष फिराव लागत. नाटक कलाकारांची एवढी बिकट अवस्था आहे की त्यांच्याकडे बघवत नाही.

पुणे ही सांस्कृतिक राजधानी असली तरी ह्या पुण्यभूमीत बरेच कलाकार आपल जीवन रंगभूमीसाठी रंगभूमीच्या सेवेसाठी अर्पण करतात. एकेकाळी रंगमंच गाजवणारी मंडळी आज त्यांना एका वेळेची खाण्याची भ्रांत आहे. एक बाजूला बॉलीवूडमधील कलाकार करोडो रुपये कमवत आहेत तर दुसरी ही मराठी कलाकरांची दयनीय अवस्था आहे. मी अशा कलाकारांबद्दल बोलत आहे जी आजही खुपच म्हातारी झाली आहेत आणि कुठलच काही काम करु शकत नाही ह्या मंडळींनी एकेकाळी रंगमंच गाजवलाय.

मी बालगंधर्वला बालगंधर्वच्या वार्षिक उत्सवासाठी गेलो होतो त्यावळेला बालगंधर्वपरिवाराने एका कलाकाराची दयनीय अवस्था बघून 50 हजारांची मदत केली होती. मला ते त्यावेळच दृष्य बघून खुपच भावूक झालो होतो. तो कलाकार एका जिन्याच्या खाली राहत होता. त्याच सर्व कुटूंब तेवढ्या जागेत राहत होत. त्याची ती संपूर्ण कहाणी ऐकून मलाही मदतीची इच्छा झाली होती.

यासाठी शाहसन स्तरावरून योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. दुर्लक्षित कलाकारांना योग्य ते मानधन देणं गरजेचे आहे. अशा लोककलाकारांनी संस्कृतिचे जतन करीत लोककला जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. नाटकांची आवड असणाऱ्या नवोदित कलाकारांना तसेच नाट्यलेखन करणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना मार्गदर्शन म्हणून कार्यशाळा तसेच चर्चासत्रे भरवणे आवश्यक आहे.

जुनी नाटकांचे अभिवाचन होऊन त्या नुसार नवीन नाटकांची निर्मीती झाली पाहीजे. महाराष्ट्राची ही नाट्य संस्कृती टिकवणे आपले कर्तव्य आहे. नाटकांतील कलाकारांचा योग्य तो सन्मान राखला गेला पाहीजे. प्रबोधनपर नाटक आणि मनोरंजन होईल अशी नाटक लिहीली पाहीजेत. ज्या नाट्यगृहामध्ये नाटक घडलेली असतात अशा नाट्यगृहाची जोपासना करणे आवश्यक आहे.

-विरेंद्र सोनवणे

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!