Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

एच.ए.एल. साठी मोठा प्रोजेक्ट द्या; संसदेत डॉ. भारती पवार यांची मागणी

Share

जानोरी । संदिप गुंजाळ : नाशिक जिल्ह्यालाच नव्हे तर भारत देशाला भूषणावह असणारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थातच एच.ए.एल. कंपनीस वर्षभरानंतर मोठ्या प्रकल्पाची प्रतिक्षा असुन त्यासाठी नवा मोठा प्रकल्प द्यावा अशी मागणी दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली.

“नभं स्पृश्यम दीप्तम” हे आमच्या भारतीय वायुसेनाचे ब्रिद वाक्य आहे. दिंडोरी मतदारसंघात, ओझरजवळील एचएएल हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही विमान बनविणारी कंपनी आहे. गेल्या ७० वर्षांपासून तेथे एचएएल लष्करी विमान तयार करते. अलीकडेच, सर्जिकल स्ट्राईकसाठी जे ‘मिग -२१’ विमान वापरले होते ते एचएलमध्येच बनविलेले होते. आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मिग-२१ आणि सुखोई ३० यांचे उत्पादन कमी वेळात आणि गुणवत्तेमध्ये तयार केले गेले आहे.

एच.ए.एल. नाशिक जिल्ह्याचे सौंदर्य म्हणजे अर्थ वाहिनी आहे. मेक इन इंडिया अंतर्गत अनेक लघु उद्योग आणि एमआयडीसी एच.ए.एल. कंपनीवर अवलंबून आहे. यामध्ये सुमारे आठ हजार कर्मचारी काम करीत आहेत. हजारो कुटुंब त्यावर अवलंबून असतात. अशा मोठ्या कंपनीकडे २०२० नंतर काम नाही ही चिंताजनक बाब आहे.

यासाठी एक चांगला मोठा प्रकल्प लवकरच ओझर एच.ए.एल. साठी उपलब्ध करून दिला तर ते पुर्ण गुणवत्तापुर्वक करण्यात येईल असा विश्वास डॉ. पवार यांनी व्यक्त केला. दोन वर्षांपासुन कर्मचा-यांचे वेतन वाढ प्रलंबित आहे. त्या संबंधित निर्णयही लवकरात लवकर घ्यावा अशी मागणी खासदार डॉ. भारती पवार यांनी संसदेत केली.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!