Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिवाळीच्या सणात येई खरेदीला उधाण; पण सोने खरेदी करतांना सावधान

Share

नाशिक : अवघ्या काही दिवसांवर दिवाळीचा सॅन येऊन ठेपला आहे. दिवली म्हटलं कि, खरेदीचा सण म्हणून ओळखला जातो. सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते, यामुळे अनेक गोष्टीची खरेदी या काळात होत असते. अशातच सोने खरेदीकडे लोकांचा कल दिसून येतो. परंतु सोने खरेदी करताना होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे सोने खरेदी करतांना काय काळजी घ्यावी, हे माहिती असणे आवश्यक आहे.

दरम्यान सणासुदीच्या काळात सोने खरेदी मोठ्याप्रमाणावर हते. अशावेळी योग्य ती काळजी घेत सोने खरेदी करावे. जसे कि सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मांडली जाते. सर्वांत शुद्ध सोने २४ कॅरेटचे असते. हे अत्यंत मऊ, मुलायम असते. त्यापासून दागिने तयार करणे शक्य नाही. दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. यात ९१. ६६ टक्के सोने असते.

तसेच प्रत्येक वस्तूवर हॉलमार्क असतो तसाच सोन्याच्या दागिन्यावरही असतो. यामुळे आपल्याला शुद्धतेची गॅरंटी असते. यात एक क्रमांक असून पाच अंक आणि दोन अल्फाबेट असतात. यातून ग्राहकाला समजते, की तो विकत घेत असलेले सोने किती शुद्ध, सोन्याचे प्रमाण किती आहे. एखाद उदाहरण घ्यायचं म्हटलं तर २ तोळ्याचे मंगळसूत्र बनवायला दिले. ज्या दिवशी दिले त्या दिवशी सोन्याचा भाव ३२६०० असेल तर हा दागिना किती कॅरेटचा असेल, असा प्रश्न उपस्थित केला पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या सोन्याच्या दागिन्यात हॉलमार्कप्रमाणे ९१. ६६ सोने असते तर खरेदी करताना तर सोनाराने ३२६०० च्या ९१.६६% सोन्याचा भाव लावला पाहिजे.

दागिना तयार झाल्यानंतर त्यावेळी त्या दागिन्यांचे नेट वेट आणि ग्रॉस वेट तपासून घेणे गरजेचे असते.तसेच जर २४ कॅरेट सोन्याची किंमत १० ग्रॅमसाठी ३२ हजार रुपये असेल, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत त्यापेक्षा कमी असेल, म्हणजे साधारण २९,३०० ते २९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम असेल. म्हणून तुम्ही जेव्हा दागिन्यांची निवड करता, तेव्हा त्या गुणवत्तेच्या सोन्याची बाजारपेठेतील किंमत तपासून पहा.

पुढील पाच गोष्ठी लक्षात ठेवा.

  • सोने दर तपासून घ्या.
  • सोन्याचे कॅरेट तपासा.
  • हॉलमार्क
  • घडणावळ
  • मेल्टिंग अँड वेस्टेज चार्जेस
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!