Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दसरा, दिवाळीसाठी बाजारपेठा सजल्या; खरेदीची लगबग

Share

नाशिक : शारदीय नवरात्र सुरू असून येत्या मंगळवारी दसरा तसेच या महिन्यात शेवटचा आठवडा दीपावली असल्याने राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. या सणांमध्ये महत्वाचे म्हणजे खरेदीची लगबग जोरदार दिसून येते.

आता सध्या नवरात्री पर्व सुरु असून शनिवारी आणि रविवारी ग्राहकांची बाजारपेठांमध्ये दिवाळीसाठी अनेक आकर्षक दागिने, विविध वस्तू, जसे लॅपटॉप, मोबाईल, वाहनखरेदी या सर्व गोष्टी खरेदी करण्यासाठी सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. वृत्तपत्रांमधील विविध स्कीम्स, आणि जाहिराती पाहून ग्राहकांचा उत्साह अधिकच वृद्धिंगत झाला आहे.

दिवाळी म्हटली की, सर्वांना आठवण येते ती,फटाक्यांची, अक्षयकंदिलांची, फराळाची आणि मोती स्नानाची दीपावली होय. दिवाळसण वसुबारस, नरकचतुर्दशी, धनत्रयोदशी, लक्षमीपूजन, दीपावली पाडवा, भाऊबीज अशी एकूण ६ दिवस मोठ्या उत्साहात आनंदात साजरी केली जाते. आकाशकंदिलांच्या रोषणाईने सर्व घरे उजळून निघतात.

ग्राहकांचे आकर्षण वाढावे म्हणून योजना जाहीर केल्या आहेत. दुचाकी, चारचाकी गाड्या खरेदी करण्यासाठी डिस्काऊंट ऑफर लागू करण्यात येणार आहे. महिला वर्गांमध्ये सध्या मंगळसूत्रे , नेकलेस , बांगड्या , पाटल्या खरेदी करण्यास अधिक पसंती दिली जात आहे.

लक्ष्मीपूजनासाठी विविध आकर्षक मूर्ती, पैंजण, चांदीची भांडी खरेदीला अधिक पसंती देण्यात येत आहे. शिवाय दिवाळीसाठी ऑनलाइन शॉप्पिंगही सध्या जोर धरू पाहत आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, यासारख्या संकेतस्थळावर दिवाळी खरेदीसाठी युवा वर्गात प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

दिवाळीची खरेदी
दिवाळी शॉपिंग म्हंटल की, अनेकजण अनारकली, साड्या, लेहेंगा खरेदीला अधिक पसंती देतात. पण यंदाच्या दिवाळीत आणखी एकाची भर पडली आहे. ती म्हणजे इंडो वेस्टर्न गाउन्सची नाशिकमध्ये सिटी सेंटर मॉल, देवळाली कॅम्प, मेनरोड, तिबेटियन मार्केट, ही प्रमुख ठिकाणे आहेत.

शॉपिंग करताना घ्यावयाची दक्षता 
कपड्यांची क्वालिटी, रंग पाहूनच खरेदी करावा. दिवाळी शॉप्पिंगची पूर्वतयारी देखील करणे गरजेचे असते. खरेदीचे योग्य नियोजन करावे. त्यानंतर बजेट निश्चित करावे.

सलिल परांजपे, देशदूत नाशिक

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!