Type to search

Breaking News दिवाळी - अनुभव (गावाकडची दिवाळी) दिवाळी - कथा/काव्य दिवाळी - कविता दिवाळी - ग्रहमान - राशीभविष्य दिवाळी - निमित्त दिवाळी - पाककृती दिवाळी - प्रवास वर्णन दिवाळी - प्रेरणा (यशोगाथा) दिवाळी - ब्लॉग दिवाळी - भाऊबीज दिवाळी - वार्षिक भविष्य दिवाळी - विशेष लेख दिवाळी विशेष - रिपोर्ताज नाशिक मुख्य बातम्या

शाळांना दिवाळीच्या २२ दिवस सुट्यांचा धमाका

Share

नाशिक । दिवाळीच्या सणानिमित्त देण्यात येणार्‍या शालेय सुट्ट्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून यंदा प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुलांना १८ ऐवजी २२ दिवस सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी यासंबंधीचा आदेश काढला असून (दि.२१) ऐवजी (दि.२२) ऑक्टोबर पासून या सुट्ट्या देण्यात येणार आहेत.

सन २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षासाठी शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्ट्यांचा कालावधी (दि.२१) ऑक्टोबर ते (दि.७) नोव्हेंबर असा निश्चित केला होता. मात्र विधानसभेची निवडणूक विचारात घेऊन व राज्य शिक्षक व शिक्षकेतर विकास संघटना, जिल्हा मुख्याध्यापक संघ, जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने सुट्ट्यांचे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली होती.

त्यानुसार शिक्षण संचालनालयाच्या निर्देशाने दिवाळी सुट्टीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार (दि. २१) ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याने (दि.२२) पासून शाळांना दिवाळीच्या सुट्ट्या देण्यात येतील. (दि.११) नोव्हेंबर पर्यंत शाळांना सुट्ट्या राहणार असून (दि.१२) नोव्हेंबरला गुरुनानक जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने (दि.१३) रोजी नियमित शाळेत शाळा भरवण्यात येईल. शनिवार. रविवार असल्याने व एक एक दिवसाआड गुरुनानक जयंती असल्याने यंदा १८ ऐवजी २२ दिवस सुट्ट्यांचा लाभ शाळांना व विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!