Type to search

दिवाळी - पाककृती

दिवाळीची रेसिपी : चंद्रकला मिठाई

Share

साहित्य – ५०० ग्रॅम मैदा, १ कप मावा ( १०० ग्रॅम ), ½ सुक्या नारळाचा खीस (डेसीकेटेड कोकोनट ), १½ टेबलस्पून काप केलेले काजू, १½ टेबलस्पून काप केलेले बादाम, १½ टेबलस्पून काप केलेले पिस्ता, १ टेबलस्पून चारोळी, ३ टेबलस्पून दूध, पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी, २/३ कप पीठी साखर, ½ कप साजूक तूप, १ टेबलस्पून हिरवी वेलची आणि जायफळ पावडर, ½ टेबलस्पून मीठ आणि तळण्यासाठी तेल

पाक तयार करण्यासाठी – १ कप साखर, १ कप पाणी, ¼ tsp हिरवी वेलची आणि जायफळ पावडर, २ टेबलस्पून दूध, १ टेबलस्पून लिंबाचा रस, ½” दालचिनी, ४ लवंग, चिमूटभर केसर.

कृती – एका परातीत मैदा घेऊन त्यात साजूक तूप, मीठ एकत्र घालून चांगले एकजीव करून घ्या. नंतर ½ ग्लास पाण्यात ३ tblsp दूध मिक्स करून हळूहळू यात सोडत चला आणि चपातीला पीठ मळतो त्यापेक्षा थोडे घट्ट मळून घ्या आणि गोळा ओलसर सुती कपड्याने १५/२० मिनिटे झाकून ठेवा. तो पर्यंत एका बाजूला पॅनमध्ये मंद आचेवर मावा, सुक्या नारळाचा खीस आणि ड्रायफ्रुटस ३/४ मिनिटे चांगले परतून घ्यावे. सारण चांगले परतून घेतल्यावर सरणाला पूर्ण थंड करून घ्यावे.

आता पाक तयार करण्यासाठी एका पातेल्यात साखर आणि पाणी घ्यावे. मध्यम आचेवर पातेलं ठेवून त्यात लवंग, दालचिनी, केसर घालून एक उकळी घ्यावी. उकळी आल्यावर त्यात १-२ टेबलस्पून दूध घालावे. साधारण १ मिनिटांनी पाकमधून मळी तयार होईल ती बाजूला काढून घ्यावी म्हणजे पाक शुद्ध होईल. त्यानंतर यात १ tblsp लिंबाचा रस घालून एकजीव करावे म्हणजे तयार चंद्रकलावर साखरेचा थर जमा होणार नाही. आता पाक पूर्ण थंड करून घ्यावा. त्यानंतर पिठाच्या छोट्या पाऱ्या लाटून घ्याव्यात.

एका पारीवर सारण घालावे आणि पारीच्या कडेला दुधाचे बोट फिरवून बरोबर मध्ये दुसरी पारी ठेवावी आणि चंद्रकलेला मुरड घालावी. तयार चंद्रकला मंद आचेवर सोनेरी तांबूस रंगावर टाळून घ्याव्यात. चंद्रकला थोड्या कोमट झाल्या कि त्यांना पाकात फक्त घोळून घ्यावे. घोळून झाल्यावर त्यांना बदाम पिस्त्याच्या कापांनी सजवून घ्यावे. तयार चंद्रकला ५/६ दिवस टिकतात. चंद्रकला मिठाई

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!