Type to search

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

जिओचा दिवाळी बम्पर धमाका; २ जीबी डेटा दररोज

Share

नाशिक : रिलायन्स जीव नेहमीच ग्राहकांना खुश करण्याच्या तयारीत असते. यंदाच्या दिवाळीत रिलायन्स जिओने अनोखे गिफ्ट दिले आहे. ग्राहकांसाठी नाव चार प्लॅन्स लाँच केले असून यात जिओ ऑल इन वन प्लॅन जारी केले आहेत.

दरम्यान या नव्या प्लॅन्स २२२ रुपयांपासून सुरु होऊन ४४४ पर्यंत आहे. २२२ रुपयांच्या प्लॅन मध्ये ग्राहकाला २ जीबी डेटा दररोज अनलिमिटेड जिओ टू जिओ व्हॉईस कॉलिंग आणि इतर नेटवर्कवर १००० कॉलिंग मिनिट देण्यात आले आहे.

प्लॅनचे तपशील पुढील प्रमाणे
जिओ ऑल इन वन
१ महिना – २२२ रुपये
२ महिने – ३३३ रुपये
३ महिने – ४४४ रूपये
दररोज २ जीबी + अमर्याद कॉलिंग
( जिओ ते जिओ अमर्याद बिगरजिओ १००० एफयूपी मिनिटे)

 

जिओ ऑल इन वन प्लॅनमध्ये विशेष काय आहे ?

  • साधे आणि सुटसुटीत प्लॅन्स : सर्व सेवांचा समावेश असलेले हे प्लॅन्स सहजपणे लक्षात राहतील अशा किमतीत उपलब्ध
  • अभूतपूर्व फायदे : २ जीबी प्रतिदिन आणि अमर्याद व्हॉईस, एसएमएस, अँप्स
  • बाजारातील सर्वांत कमी दर : स्पर्धक कंपन्यांचा तुलनेत २० ते २५ टक्के स्वस्त प्लॅन्स
  • एक महिन्याचे अपग्रेड केवळ १११ रुपयांत : मूळ प्लॅनच्या किमती अतिरिक्त १११ रुपयांत एक महिना अतिरिक्त सेवा
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!