Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : दिवाळीच्या खरेदीसाठी मेनरोडला गर्दीचा महापूर

Share

नाशिक : आज धनत्रोयदशीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मेनरोड परिसरात खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसून आले. नागरिकांनी खरेदीसाठी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती वस्तू, लाईटिंगच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. विशेषतः शालिमार, मेनरोड, आरके परिसरात गर्दीचा महापूर दिसून येत असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडाली होती.

दरम्यान आज दिवाळीचा पहिला दिवस असून या दिवशी सायंकाळी नागरिकांनी बाजारात एकच गर्दी दिसून आली. यावेळी तरुण तरुणींसह आबालवृद्धी खरेदी करतांना दिसून आले. तसेच उद्या शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असून सलग तीन दिवस सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शाळा, महाविद्यालयांना देखील सुट्ट्या लागल्या असून खरेदीचा तरुणवर्गही उत्साहित होता.

दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दीचा महापूर

दिवाळीच्या खरेदीसाठी गर्दीचा महापूर नाशिक : आज धनत्रोयदशीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील मेनरोड परिसरात खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठांना जत्रेचे स्वरूप आल्याचे दिसून आले. नागरिकांनी खरेदीसाठी कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती वस्तू, लाईटिंगच्या दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केली होती. विशेषतः शालिमार, मेनरोड, आरके परिसरात गर्दीचा महापूर दिसून येत असून सोमवारी रात्री उशिरापर्यंत खरेदीसाठी अनेकांची झुंबड उडाली होती.

Posted by Deshdoot on Friday, 25 October 2019

येत्या मंगळवारी भाऊबीज असल्याने गावाकडे जाणार्‍या नागरिकांनी एसटी स्थानके, बसस्थानके, गर्दी केली होती. त्यापूर्वी खरेदीसाठी विविध ठिकाणी गर्दीचा महापूर आला होता. दिवाळीच्या मुहूर्तावर सोने, नवीन वाहने खरेदीला अनेकांनी प्राधान्य दिले होते. तर मिठाई, पेढ्यांच्या दुकानांसह आकर्षक गिफ्ट वस्तूंच्या दुकानांमध्येही नागरिकांची गर्दी दिसून आली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!