Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

दिवाळी २०१९ : कुछ मिठा हो जाये …! सणात मिठाईचा गोडवा

Share

नाशिक । सणांचा राजा दिवाळी आणि मिठाई हे समीकरणच आहे. अगदी चंद्रमौळी झोपडीपासून ते नवकोट नारायणांच्या बंगल्यातही मिठाई शिवाय दिवाळी साजरी होत नाही.अत्यंत आकर्षक पद्धतीने सजवलेली मिठाईची खोकी, पेट्या, परड्या, हॅम्पर सजला असून आप्तेष्ठ-मित्रपरिवारांना देण्यासाठी मिक्स मिठाई आणि कमी गोड मिष्ठांना मागणी आहे.

दीपोत्सवामुळे बाजारपेठेत चैतन्य पसरले असून हवाईच्या दुकाने चित्ताकर्षक आणि अत्याधुनिक मिठाई खोक्यांनी सजली आहे. विशेष म्हणजे दीपोत्सवातच्या औचित्यावर मित्रपरिवारांना देण्यासाठी मिठाई घेणार्‍यांचे प्रमाण गत वर्षीच्या तुलनेने यंदा वाढल्याचे हलवाई दुकानदारांनी सांगितले.

कंपन्या, आस्थापना. फर्म आणि व्यावसायिकही आपल्या सेवकांना देण्यासाठी मिक्स मिठाईला पसंती देत आहे. पूर्वी इतके हल्ली कुणी जास्त मिष्ठान्ने सेवन करत नसली तरी दीपोत्सवाच्या निमित्ताने ‘कुच्छ मिठा हो जाये’म्हणत सारेच परस्परांचे तोंड गोड करतात. त्यामुळे काजू कतली, मावा बर्फी या पारंपरिक मिष्ठान्नाशिवाय हल्ली आरोग्याबद्दल जागृती वाढल्याने शुगर फ्री मिठाई आणि कमी गोड असलेल्या दुग्धजन्य मिठाईचा सुंगध यंदा गतवर्षीच्या तुलनेत अधिक दळवला आहे.

काजूची-बादाम, अंजीर, अक्रोड अश्या सुकामेव्याचा विपूल वापर केलेली मिठाई ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. तर गाईच्या दुधापासून तयार केलेली बर्फीचीही काही दुकानात चलती दिसून आली. पूर्वी घरगुती मिठाईंच सेवन केली जात मात्र हल्ली बंगाली खाद्य संस्कृतीसारखे सर्वच मिष्ठान्न ‘रेडिमेड’ मागवण्याची पद्धत चांगलीच रुळली आहे. विशेष म्हणजे अंगुर मलाई, रसमलाई, रसगुल्ला, चमचम, संदेश अशा ‘टिपीकल’ बंगली पदार्थाचा सुंगध महाराष्ट्रीन ग्राहकांना आकर्षित करत आहे.

रसमलाई, ‘मिक्सफ्रूट’ला पसंती
दीपोत्सवानिमित्त मिक्सफ्रूट मिठाईला मागणी अधिक आहे. यासह दिवाळीचे चार दिवस विविध मिष्ठान्नांसाठी रस मलाई, श्रीखंड, बासुंदीला मोठी मागणी असते. दीपोत्सवामुळे ग्राहकी वधारली आहे.
-आनंद अग्रवाल, गुप्ता मिठाई

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!